The गडविश्व
गडचिरोली, १९ मार्च : तालुक्यातील अलोणी शेतशिवारात मिळून आलेला ५ ड्रम मोहफुलाचा सडवा मुक्तीपथ तालुका चमू व गाव संघटनेने संयुक्तरित्या नष्ट केला
अलोणी गावातील दारूविक्रेते जंगलपरिसरात व शेतशिवारात हातभट्टी लावून मोहफुलाची दारू गाळतात.या गावातील ठोक विक्रेते जिल्हा मुख्यालयासह बोदली, माडेतुकुम, विश्रामपुर व इतर गावातील किरकोळ विक्रेत्यांना दारू पुरवठा करतात. दरम्यान, अलोणी शेतशिवारात दारू गाळण्यासाठी मोहफुलाचा सडवा टाकला असल्याची माहिती मिळाली. प्राप्त माहितीच्या आधारे बोदली-मेंढा गाव संघटना व मुक्तीपथ तालुका चमूने संयुक्त कार्यवाही करून ५ड्रम मोहफुलाचा सडवा व साहित्य नष्ट केले.
(The Gadvishva) (Gadchiroli News Updates) (The gdv) (Muktipath) (Chandrpur News Updates) (Nottm Forest vs Newcastle) (Lance Reddick) (F1) (OPPO N2 Flip) (IND vs AUS) (Australia vs India)