‘गडचिरोली ऑल मीडिया असोसिएशन’ ची सूत्रे आता पत्रकार उदय धकाते व व्यंकटेश दुडमवार यांच्याकडे

38

The गडविश्व
गडचिरोली, दि. ३१ : गडचिरोली जिल्ह्यात मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडियामध्ये कार्यरत असलेल्या पत्रकारांना एकत्रित करून तयार करण्यात आलेल्या ‘गडचिरोली ऑल मीडिया असोसिएशन’ ची सूत्रे आता पत्रकार उदय धकाते व व्यंकटेश दुडमवार यांच्याकडे संघटनेच्या वतीने सोपविण्यात आली आहे. नुकताच २९ डिसेंबर २०२४ रोजी ‘गडचिरोली ऑल मीडिया असोसिएशन’ (GAMA) ची नवीन कार्यकारिणी गठित करण्यात आली त्यात सर्वानुमते पत्रकार उदय धकाते व व्यंकटेश दुडमवार यांची संयोजक पदी निवड करण्यात आली आहे.
बातमी, घडामोडी लाखो वाचकांपर्यंत अत्यंत जलद गतीने पोहचविण्याचे साधन म्हणून डिजिटल मीडिया हे व्यासपीठ उदयास आले आहे. गडचिरोली जिल्ह्यातील डिजिटल मीडियामध्ये कार्यरत असलेल्या पत्रकारांनी ‘गडचिरोली ऑल मीडिया असोसिएशन’ (GAMA) या संघटनेच्या माध्यमातून एकत्रित येत संघटित झाले आहेत. डिजिटल मीडियाच्या माध्यमातून असंख्य वाचकांपर्यंत जगभरात बातम्या, घडामोडी पोहचविण्याचे काम सुरू असून गडचिरोली ऑल मीडिया असोसिएशनच्या
जिल्ह्यातील विविध पत्रकार परिषदा घेण्यात आल्या आहे. जगभरातील काना कोपऱ्यात डिजिटल मीडियाच्या माध्यमातून असंख्य वाचकांपर्यंत बातम्या पोहचवून शासन प्रशासनाला जागे करण्याचे काम तत्परतेने गामा चे पत्रकार करतात. या मुळे गामा ही पत्रकारांची संस्था जिल्ह्यात नावलौकिक प्राप्त केले आहे.
‘गडचिरोली ऑल मीडिया असोसिएशन’ (GAMA) ची नवीन कार्यकारणी गठित करण्यात आली. आता पत्रकार उदय धकाते व व्यंकटेश दुडमवार यांच्याकडे संघटनेची सूत्रे सर्वानुमते सोपविण्यात आली आहे. संघटनेत सात नव्या पत्रकारांची नवीन नोंदणी करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीबद्दल कार्यकारिणी जेष्ठ सदस्य जयंत निमगडे गडचिरोली वार्ता न्युज,अनिल बोदलकर, एविबी न्युज, किशोर खेवले लोकप्रवाह न्युज, संपादक विदर्भ क्रांती, संपादक द गडविश्व, संतोष सुरपाम संतोष भारत, निलेश सातपुते (लोकवृत्त) प्रवीण चनावार (वृत्तवाणी), आदी उपस्थित होते. यावेळी सर्वांनी अभिनंदन केले आहे.

पत्रकार परिषदांसाठी संपर्क

१)उदय धकाते (९४२३४२२३२३)
२)व्यंकटेश दुडमवार (९४२२६२४४६६)

यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन गडचिरोली ऑल मीडिया असोसिएशन “गामा” च्या वतीने करण्यात आले आहे.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #digitalnews #digitalmedia )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here