यशोगाथा..
माझे नाव दुषाली सुधाकर अलगमकर मु. उमरी पोस्ट कोनसरी तह. चामोर्शी जिल्हा गडचिरोली.
माझे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा उमरी तहसील चामोर्शी जिल्हा गडचिरोली येथे झाले. महाविद्यालयीन शिक्षण आष्टी येथील महात्मा ज्योतिबा फुले कनिष्ठ महाविद्यालय येथे झाले.
मला लहानपणापासूनच पोलीस बनण्याची आवड होती पण मला वाटलं नव्हतं की मी पोलीस होणार म्हणून. मी २०२३ मध्ये बी.ए. तृतीय वर्षाला असतांना आमच्या गावचे दादा पोलीस भरतीची सराव करत होते त्यांना पाहून मलाही पोलीस भरतीची आवड निर्माण झाली त्यानंतर मी गावातच त्यांच्यासोबत भरतीची सराव करायची. काही दिवसांनी दादांनी सांगितलं की तु गडचिरोलीला जा तिथे लक्ष्यवेध स्पर्धा परीक्षा अकॅडमीमध्ये क्लासेस लाव तिथे छान शिकवितात. त्यानंतर मी नोव्हेंबर महिन्यात गडचिरोलीला आली आणि लक्ष्यवेध स्पर्धा परीक्षा अकॅडमी मध्ये प्रवेश घेतला. प्रा. राजीव सर हे लक्ष्यवेध अकॅडमीचे संचालक असून त्यांच्याशी माझी ओळख झाली. राजीव सर मराठी व्याकरण व सामान्य ज्ञान खूप सुंदर पद्धतीने व कोणत्याही विषयाला पुस्तक हातात न घेता शिकवितात. मला सरांबद्दल आश्चर्य वाटलं की सर कोणत्याही विषयाकरिता पुस्तक हातात न घेता तोंडपाठ शिकवतात. मी उशिरा ऍडमिशन घेतल्याने मला शिकविलेलं काहीही समजत नव्हतं सर्व विषय खूप समोर निघून गेले होते. मी नोव्हेंबर महिन्यात गडचिरोली आली आणि डिसेंबरच्या दोन तारखेला माझे भाऊजीचा मृत्यू झाला. माझ्या ताईचे मुलेही खूप लहान होते त्यामुळे मी खूप डिप्रेशनमध्ये असायची. माझ्या घरच्यांची अपेक्षा होती की, मी लागली तर माझ्या ताईला आधार होईल पण मी खूप उशिरा गेल्यामुळे मला मागील भरतीत अपयश आले. त्यानंतर राजीव सरांनी मला समजावून सांगितलं की तू गडचिरोलीला ये क्लास कर पुन्हा भरती निघणार आहे. त्यानंतर मी, मे महिन्यामध्ये गडचिरोलीला आली. त्यानंतर मला सरांनी म्हटलं तू पैसे वगैरे काही देऊ नको ये आणि क्लास कर, त्यानंतर मी पुन्हा अभ्यासाला सुरुवात केली, मला कोणतीही अडचण असली की राजीव सरांना सांगायची आणि राजीव सर मला सतत मार्गदर्शन करायचे. राजीव सर हे एक चांगले शिक्षक तर आहेतच त्यासोबतच त्यांच एक चांगल व्यक्तिमत्व आहे जे इतर शिक्षकांमध्ये नाही असे मला वाटते. इतर अकॅडमी मधील शिक्षक शिकविण्यापूर्तीच मर्यादित असतात पण राजीव सर मुलांना शिकवण्यापुरतीच मर्यादित नाहीत तर समाजात वावरायचं कसं, बोलायचं कसं आपल्या अकॅडमीला एक अकॅडमी नाहीतर आपल्या परिवारासारखे समजतात. त्यांच्यामध्ये एक वेगळाच व्यक्तिमत्व आहे जे इतर अकॅडमीच्या शिक्षकांमध्ये नाही. पण सरांचं बोलणंही तेवढेच कडक आहे. सरांबद्दल जेवढं आपुलकी आणि प्रेम आहे पण तेवढचं सरांची खूप भीती वाटायची आताही वाटते पण तेवढी नाही. सरांनी जे माझ्यासाठी केलं ते मी कधीच विसरणार नाही माझी कोणतीही अडचण असली की, मी राजीव सरांना सांगायची आणि त्या अडचणीमधूनही राजीव सरच मला बाहेर काढायचे “गुरु असावे तर राजीव सरांसारखे” प्रत्येक मुलांच्या आई वडिलांच तर स्वप्न असतेच की आपली मुलं यशस्वी व्हावी पण एका गुरुचे स्वप्न असणं ही आपल्या आयुष्यातील खूप मोठी गोष्ट आहे. आणि मी खूप नशीबवान आहे की मला असे गुरु मिळाले. माझ्या मनात राजीव सरांबद्दल जो आदर, मानसन्मान आहे ते मी शब्दातही स्पष्ट करू शकणार नाही. सरांबद्दल जेवढं लिहिलं जाईल तेवढं कमीच आहे. सरांनी जे माझ्यासाठी केलं ते मी नोकरी लागूनही त्यांचे उपकार फेडू शकणार नाही. मी खूप भाग्यवान आहे की, मला राजीव सरांसारखे गुरु मिळाले. मी आज जे काही आहे ते माझ्या आई वडील आणि राजीव सर यांच्या आशीर्वादाने. त्यांच्यामुळेच हे शक्य झालं. नाहीतर अशक्यच होते.
एका वर्षात मी पोलीस दलात शिपाई म्हणून दाखल झाली. मला लक्ष्यवेध स्पर्धा परीक्षा अकॅडमी सारखी अकॅडमी कुठेच मिळाली नसती आणि माझ्या गुरु सारखे गुरु कुठेच मिळाले नसते .तसेच मला कोणत्याही अडचणीमध्ये मदत करणारे महेश सर, अश्विनीताई, दिनेश दादा, हेमंत दादा, श्रेयश दादा, पंकज दादा यांनी सुद्धा मला खूप मदत केली. प्रत्येकाच्या आयुष्यात अडचणी असतात पण त्यांना सामोरे जाण्याच सामर्थ्यही आपल्यात असायला हवं आज मी जे काही आहे ते लक्ष्यवेध स्पर्धा परीक्षा अकॅडमीचे प्रा. राजीव सर यांच्यामुळेच मला नवीन ओळख मिळाली नाहीतर मी तर शून्यच होती… थँक्यू सो मच राजीव सर..
आज मला मनोगत लिहिण्याची संधी दिली त्याबद्दल “The गडविश्वचे” मनापासून धन्यवाद…
– दुषाली सुधाकर अलगमकर
निवड गडचिरोली पोलीस शिपाई 2023-24