५ फेब्रुवारी पासून रंगणार ‘लॉयड मेटल गडचिरोली प्रीमियर लीग’ चा थरार

77

– क्रिकेटर रवि शास्त्री येणार उद्घाटनाला
The गडविश्व
गडचिरोली, दि. १३ : येथील जिल्हा प्रेक्षगार मैदानावर ५ फेब्रुवारी पासून ‘लॉयड मेटल गडचिरोली प्रीमियर लीग’ (जीपीएल) चा थरार रंगणार आहे. सदर
स्पर्धेचे सर्व सामने दिवस-रात्र खेळवल्या जाणार असून या क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनाला क्रिकेटर रवि शास्त्री येणार असल्याची माहिती आयोजित पत्रकार परिषदेत एस. एस. खांडवावाला  पूर्व डिजीपी गुजरात तथा  BCCI अँटी करप्शन ब्युरो यांनी दिली. पत्रकार परिषदेला कर्नल मेहता,भोलू सोमनानी, मंगेश देशमुख, वेदांत जोशी, रोमित तोंबर्लावार, डॉ.चन्नी सलूजा  हजर होते.
या स्पर्धेत जिल्ह्याभरातील १६ संघ सहभागी होणार असून यात ४ गटामध्ये संघ विभागणी करण्यात आली आहे. ४ गटामधून पहिले दोन अव्वल संघ एकमेका विरोधात क्वार्टर फायनल खेळणार आहेत त्यानंतर विजेता होणारा सेमीफायनल व त्यातून विजेता होणारा यांच्यात अंतिम सामना होणार आहे.अंतिम सामना हा फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी शेवटी होणार आहे.
‘लॉयड मेटल गडचिरोली प्रीमियर लीग’ (जीपीएल) क्रिकेट स्पर्धेत प्रथम पारितोषिक रु. ११ लाख ११ हजार ११ रुपये असणार आहे, द्वितीय पारितोषिक रु. ७ लाख आणि तिसरा ५ लाख रु.आहे. चौथा पारितोषिक २ लाख रु.असणार आहे. प्रत्येक सामन्यात मॅन ऑफ द मॅच २५ हजार रु. क्वार्टर फायनल सामन्यातील मॅन ऑफ द मॅच ५० हजार रु, सेमी फायनल सामन्यातील मॅन ऑफ द मॅच ७५ हजार रु. व अंतिम सामन्यात मॅन ऑफ द मॅच १ लाख रुपयांची बक्षिसे जाहीर केली आहेत. क्रिकेट स्पर्धा हि जवळपास १५ दिवस चालणार आहे. सामन्यातील पंच हे उच्च दर्जाचे राहणार आहेत. रनिंग कॉमेंट्रीसाठी प्रसिद्ध अँकरना आमंत्रित करण्यात आले आहे. संपूर्ण सामने यू ट्यूबवर थेट दाखवले जातील आणि जगभरातील क्रिकेटप्रेमी ते पाहू शकतील, असेही पुढे सांगण्यात आले. तसेच ही स्पर्धा पुढील पाच वर्ष सतत चालणार आहे असेही सांगण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here