The गडविश्व
मुंबई, २४ मे : राज्यातील दहावी, बारावीची परीक्षा दिलेले विद्यार्थी आपल्या निकालाची आतुरतेने वाट पाहत आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावी निकालासंदर्भात महत्वाची माहिती देत बारावीचा निकाल उद्या २५ मे रोजी दुपारी २ वाजता जाहीर केला जाणार आहे.
असा पहा निकाल : Maharesult.nic.in
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education) मार्च – एप्रिल २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षांचे निकाल अधिकृत वेबसाइटवर पाहता येणार आहेत.
या संकेतस्थळावर पहा निकाल
www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालाबरोबरच वेगवेगळी सांख्यिकी माहिती उपलब्ध होईल तर www.mahahscboard.in या संकेतस्थळावर शाळांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.