The गडविश्व
जारावंडी, १९ फेब्रुवारी : यशाचा कोणताही सिक्रेट फॉर्म्युला किंवा शार्टकट नसतो. यश नेहमीच अपार कष्ट, मेहनत, नियोजन व अपयशातून शिकल्याची वृत्ती यांच्या एकत्रीत संगमातून आकाराला येत असते असे प्रतिपादन प्राचार्य भारत पंधरे यांनी शासकीय माध्यमिक तथा उच्च माध्यमिक आश्रम शाळा, जारावंडी येथे इयत्ता १० वी व १२ वी च्या विद्यार्थ्यांना निरोप देयात आला याप्रसंगी ते कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.यावेळी प्रमुख अतिथी म्हणुण आर. एस. आत्राम आदिवासी विकास निरीक्षक प्रकल्प भामरागड, गोपालभाऊ लोखंडे, अभिमन्यु वाटगुरे, अनिल बारसागडे, महेंद्र गेडाम, भाग्यश्री काटेंगे, अश्वीनी भुईभार, राम ढोबळे, करुणा मेश्राम (अधिक्षिका), लीना वाटगुरे, संदिप गेडाम, रमेश मादरबोईना, हर्षद गेडाम उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अभिमन्यू वाटगुरे यांनी केले. यावेळी इयत्ता १० वी व १२ वी च्या विद्यार्थ्यांनी शाळेतील आपले अनुभव कथन करतांना शाळा व शिक्षकाविषयी कृतज्ञता आपल्या मनोगतातून व्यक्त केली. तसेच या विद्यार्थ्यांनी शाळेला महापुरुषांच्या प्रतिमा भेट दिल्या.
यावेळी ए. एम. बारसागडे, आर. एस. आत्राम, जी.एल. लोखंडे, अश्वीनी भुईभार यांची समायोचीत भाषणे झाली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन दिसा टेकाम व आभार रोशनी बाडवरे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जयेश चौधरी, श्रीराम कोलते, मैनु आतला मनिराम सेउमेक, अतुल बोरुले, लक्ष्मण माने, विकास मोहुर्ले, कु. कोडापे, वाघ, मेश्राम, चंदु पोटावी, पकंज रायपुरे, शुभम मडावी, काशीवार व इयत्ता ९ वी ११ वी च्या विद्यार्थ्यांनी अथक परीश्रम घेतले.

(The Gadvishva) ( Gadchiroli News updates) (Jarawandi)