– अभाविप गडचिरोली ने चंद्रपुरात गोंडवाना विद्यापीठाच्या उपकेंद्राकरीता ८.५३ एकर जागा मंजूर केल्याच्या निर्णयाचे केले स्वागत
The गडविश्व
गडचिरोली, २४ जून : महाराष्ट्र शासनाने नुकतेच काही दिवसांपूर्वी चंद्रपूर येथे गोंडवाना विद्यापीठाच्या उपकेंद्रकरिता ८.५३ जागा मंजून केल्याने अभाविप गडचिरोली ने त्या निर्णयाचे स्वागत केले असून हे उपकेंद्र चंद्रपूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना दिशा देणारे उपकेंद्र असेल असे मत अभाविप विदर्भ प्रदेश मंत्री शक्ती केराम यांनी व्यक्त केले आहे.
चंदपूर जिल्ह्यात काही वर्षा अगोदर गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली चे उपकेंद्र नसल्यामुळे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना गोंडवाना विद्यापीठाचे मुख्यालय भौगोलिक अंतरामुळे लांब पडत होते. विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामकाजाकरीता विद्यापीठ केंद्रावर जायचे झाल्यास शारिरिक व आर्थिक कसरत करावी लागायची यामुळे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद चंद्रपूर महानगरव्दारा अनेक वर्षाच्या सातत्यूपर्ण विद्यार्थी आंदोलनातून केलेल्या मागणीमुळे गोंडवाना विद्यापीठाचे उपकेंद्र चंद्रपूर येथे सुरू झाले. शासकीय जमिनीअभावी हे उपकेंद्र शांताराम पोटदुखे विधी महाविद्यालयाच्या इमारतीत सुरू होते.
महाराष्ट्र शासनाच्या आदेशान्वये गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठाचे उपकेंद्र आता चंद्रपुरात साकारण्यात येणार आहे. त्यासाठी शासनाने ८.५३ एकर जागा मंजूर करून विद्यापीठाच्या उपकेंद्र इमारतीकरीता मान्यता दिली आहे. शासनाच्या या निर्णयाचे अभाविप चंद्रपूर महानगरव्दारा स्वागत करण्यात आले आहे.
चंद्रपूर शहरातील बाबुपेठ मोहल्ला येथील खुली जागा गोंडवाना विद्यापीठाचे उपकेंद्र स्थापन करण्याच्या दृष्टीने उपलब्ध असल्याचे उपअधीक्षक, भुमी अभिलेख कार्यालय, चंद्रपूर यांनी नमूद केले आहे. त्यानुसार ही जागा शासनाव्दारे गोंडवाना विद्यापीठाच्या चंद्रपूर उपकेंद्रासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात १५ तालुक्यांचा समावेश आहे. १३३ महाविद्यालये गोंडवाना विद्यापीठाशी संलग्न आहेत. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना मोठे अंतर विद्यापीठात जाण्यासाठी पार करावे लागत होते.
आता चंद्रपुरातच गोंडवाना विद्यापीठाचे उपकेंद्र स्थापन होणार असल्याचे विद्यार्थ्यांना होणारा त्रास वाचणार आहे. स्थानिक पातळीवरच उपकेंद्र साकार होणार असल्याने विद्यार्थ्यांच्या हक्काचे हे उपकेंद्र चंद्रपूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी ऊर्जेच केंद्र ठरेल व चंद्रपूर जिल्ह्यातील कुठलाही विद्यार्थी हा शिक्षणा पासून वंचित राहणार नाही, चंद्रपूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना दिशा देणारे हे उपकेंद्र असेल.