– परिसरात शोधमोहीम तीव्र, मृतदेह आणि शस्त्र घेतले ताब्यात
The गडविश्व
गडचिरोली / दंतेवाडा(छ.ग), २० सप्टेंबर : महाराष्ट्र राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांना पुन्हा एकदा नक्षल्यानी पत्रके टाकून धमकी दिल्याची माहिती पुढे येत आहे तर छत्तीसगडमधील दंतेवाडा जिल्ह्यातील काकडी-नहारी जंगल परिसरात बुधवारी सकाळच्या सुमारास उडालेल्या पोलीस नक्षल चकमकीत दोन नक्षल ठार झाल्याची घटना पुढे येत आहे.
महाराष्ट्र राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांना यांना गट्टा परिसरात नक्षल्यांनी पत्रके टाकून धमकी दिली आहे. या धमकीपत्रात मंत्री धर्मरावबाबा आत्राम आणि त्यांच्या काही निकटवर्तीय लोकांवर नक्षल संघटनांचा रोष दिसून येत आहे. लोहखनिज प्रकल्पांना समर्थन देणे न थांबवल्यास गंभीर परिणामांचा इशारा यात देण्यात आला आहे. त्यामुळे गडचिरोलीमध्ये एकच खळबळ उडाली असून वर्षभरात मंत्री आत्राम यांना नक्षल्यांनी दिलेली ही तिसरी धमकी दिली आहे.
तर छत्तीसगडच्या दंतेवाडा जिल्ह्यातील अरणपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काकडी-नहारी जंगल परिसरात मोठ्या प्रमाणात नक्षली उपस्थित असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली असता मंगळवारी रात्री जवान अभियान वर गेले, बुधवारी सकाळी हे पथक काकडी-नहारी जंगलात पोहोचले तेव्हा आधीच घात लावून बसलेल्या नक्षल्यांनी त्यांच्यावर गोळीबार सुरू केला. दरम्यान जवानांनी प्रत्युत्तरादाखल गोळीबार करत दोन महिला नक्षलींना कंठस्नान घातले. ही चकमक सुमारे अर्धा तास चालल्याचे सांगण्यात येत असून दोन्ही नक्षल्यांचे मृतदेह आणि शस्त्र जप्त करण्यात आले आहे. एक इन्सास आणि १२ बोअर शस्त्रांसह स्फोटक वस्तूही सापडल्या. चकमक परिसरात अद्यापही शोधमोहीम सुरू असल्याचेही कळते. ©©
(the gdv, the gadvishva, gadchiroli, dantewada, cg news, dharmravbaba atram)