गडचिरोली : वाघाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या महिलेची अखेर मृत्यूशी झुंज संपली

1023

– उपचारादरम्यान झाला मृत्यू
The गडविश्व
गडचिरोली, २७ डिसेंबर : जिल्हयातील आंबेटोला- अमिर्झा मार्गावरील जंगलालगत असलेल्या शेतशिवारात वाघाने हल्ला करून आंबेटोला येथील मंगला प्रभाकर कोहपरे (५०) या महिलेस गंभीर जखमी केल्याची घटना सोमवार २६ डिसेंबर रोजी दुपारच्या सुमारास घडली. दरम्यान जखमी अवस्थेत सदर महिलेला जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल केले असता अखेर मृत्यूशी झुंज देतांना महिलेचे दुखद निधन झाले. त्यांच्या मृत्यूने कुटुंबावर दुखांचा डोंगर कोसळलेला असून गावात शोककळा पसरली आहे.
जिल्हयात वाघाचे मानवावरील हल्ले थांबता थांबेना, एक घटना होत नाही तो काही दिवसात पुन्हा अशा प्रकारची घटना घडत आहे. परिसरात धुकाकुळ माजवणाऱ्या वाघास जेरबंद करण्याची मागणी सातत्याने नागरिक करीत आहे मात्र वनविभागाला वाघ हुलकावणी देत असल्याचे कळते. तर सदर परिसरात वाघीन असल्याने तिला जेरबंद करण्याचे आदेश तुर्तास थांबविण्यात आले आहे. त्यामुळे पुन्हा हल्ला करणारी ती वाघीण तर नाही ना ? असा प्रश्न उपस्थित होत असून अशा घटनेने मात्र परिसरातील नागरिक भयभित झाले असून जंगलालगत शेत असल्याने शेती करावी कशी ? असा देखील प्रश्न उपस्थित होत आहे. सततच्या घटनेने मात्र परिसरातील नागरिक वनविभागाप्रती संताप व्यक्त करीत असून वाघाला जेरबंद करण्यात यावे अशी मागणी सातत्याने करीत आहे.

(The Gadvishava) (Gadchiroli News Updates) (Tiger Attack) (Salman Khan) (David Warner) (Steve Smith) (Sandeep Sharma) ( Chelsea vs Bournemouth ) (Road Accident) (DHanora)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here