– शहरात खळबळ
The गडविश्व
गडचिरोली, २० मार्च : शहरातील मध्यभागी असलेल्या चंद्रपूर मार्गावरील कृषी विज्ञान केंद्राच्या आवारात वाघ शिरल्याची माहिती पुढे येत असून शहरात एकचं खळबळ उडाली आहे.
घटनेची माहिती वाऱ्यासारखी शहरात पसरताच घटनास्थळी बघ्यांची झुंबड उडाली. कृषी विज्ञान केंद्र आवारात दोन पिलांसह वाघीण असल्याची माहिती कळत असून घटनास्थळी असलेल्या वनकर्मचाऱ्यांनकडून या घटनेला अधिकृत दुजोरा मिळाला आहे.
तर जेरबंद करण्यास चंद्रपूर येथून रेस्क्यू टीम पाचारण करण्यात आली आहे अशीही माहिती पुढे येते आहे.
शहराच्या माध्यभागापर्यंत वाघाने प्रवेश केल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे.