चातगाव – गडचिरोली मार्गावर वाघाचे दर्शन

436

– नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
The गडविश्व
ता.प्र / धानोरा, १९ ऑक्टोबर : धानोरा-गडचिरोली मार्गावर असलेल्या सावरगाव जवळील मामा-भाच्या देवस्थानजवळ आज १९ ऑक्टोबर रोजी सकाळी सात ते साडेसातच्या दरम्यान सकाळी जाणाऱ्या प्रवाशांना वाघाचे दर्शन झाले. त्यामुळे नागरिकात भीतीचे वातावरण पसरलेले आहेत. चातगाव वनविभागात वाघाचा वावर आहे. आज सकाळी गडचिरोली-धानोरा मार्गावरून प्रवास करताना प्रवाशांना वाघाचे दर्शन झाले. याबाबत वनविभागाने लक्ष घालून त्या ठिकाणी बंदोबस्त करण्यात यावा. सध्या धान कापणीला सुरुवात झाली असून धान कापणाऱ्या मजुरांमध्ये व नागरिकात तसेच जाणाऱ्या येणाऱ्या प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. यासाठी वनविभागांनी तात्काळ या वाघाचा बंदोबस्त करावा अशी नागरिकांनी मागणी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here