आज येरकड येथे परिसरातील शेतकऱ्यांचे शासनाविरोधात रास्ता रोको आंदोलन

413

The गडविश्व
ता.प्र /धानोरा, १६ फेब्रुवारी : सन २०२२-२३ या खरीप हंगामात तालुक्यातील धान्य खरेदीची मुदत शासनाने वाढवून त्याचबरोबर धान्य खरेदीचे उद्दिष्ट खरेदी केंद्राना वाढवून द्यावी अशा मागणीचे निवेदन तहसीलदार धानोरा व वरिष्ठ अधिकारी यांना देण्यात आले होते तसेच सदर निवेदनाची दखल १४ फेब्रुवारी पर्यंत न घेतल्यास रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. आता सदर निवेदनाची कोणतीही दखल न घेतल्याने आज १६ फेब्रुवारी रोजी येरकड येथे परिसरातील शेतकऱ्यांचे शासनाविरोधात रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.
पत्रकात म्हटले आहे की, सन २०२२-२३ या खरीप हंगामात तालुक्यातील शेतकऱ्यांचे धान्य शासनाकडून टीडीसी खरेदी होत आहे. परंतु उपप्रादेशिक व्यवस्थापक धानोरा यांचेशी मौखिक चर्चेनंतर असे समजले की शासनाकडून १५ फेब्रुवारी २०२३ पर्यंत धान्य खरेदीची अंतिम मुदत असून त्यांच्याकडे शासनाने ठरविलेल्या धान्य खरेदीचे उद्दिष्टे संपले आहे व अजून पर्यंत धानोरा तालुक्यातील अंदाजे २०१८ शेतकरी धान्य विक्री पासून वंचित आहेत. त्या कारणाने शेतकऱ्यांना बँकेचा पीक कर्ज चुकविता येणार नाही. तसेच कौटुंबिक जीवन सुद्धा ढासळण्याच्या स्थितीत आहे त्यामुळे शासनाने खरेदीची मुदत वाढवून त्याचबरोबर धान्य खरेदीचे उद्दिष्ट खरेदी केंद्राना वाढवून देणे गरजेचे आहे जर १४ फेब्रुवारी २०२३ पर्यंत उपरोक्त गंभीर विषयाचा प्रश्न मार्गी लागत नसेल तर शासनाचे प्रशासनाचे व लोकप्रतिनिधीचे लक्ष वेधण्याकरिता शांततेच्या मार्गाने परिसरातील शेतकरी रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन तहसीलदार धानोरा व वरिष्ठ अधिकारी यांना देऊन सुद्धा शेतकऱ्यांच्या समस्येचे निराकरण होऊ शकले नाही. त्यामुळे तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांनी रास्ता रोको आंदोलन सहभागी व्हावे, आपल्या मालाची विक्री करने गरजेचे आहे, जोपर्यन्त आंदोलन करण्यात येणार नाही तोपर्यंत शासनाला जाग येणार नाही त्यासाठी सर्व शेतकरी बांधवांनी १६ फेब्रुवारी सकाळी १०.०० वाजता येरकड येथील राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलनात सहभागी व्हावे. सर्व शेतकरी उपस्थित राहून आंदोलनास सहकार्य करण्याचे आवाहन लालाजी जागधुंर्वे, विनोद देवराव पदा ,देवनाथ कूमोटी, आनंदराव शिवराम पदा, अरुण टेंभुर्ण, स्वप्निल शंकर कोडाप यांनी केले आहे.

(The Gadvishva) (The Gdv) (Dhanora) (Yerkad)

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here