उद्या २४ जुलै ला‘सर्च’ रुग्णालयात श्वसनविकार व कान, नाक, घसा आरोग्य तपासणी शिबीर

97

The गडविश्व
गडचिरोली, दि. २३ : धानोरा तालुक्यातील चातगाव येथील सर्च रुग्णालयात उद्या २४ जुलै २०२४ रोजी महिन्याचा चौथ्या बुधवारला श्वसनविकार व कान, नाक आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये मध्ये दत्ता मेघे हॉस्पिटल सावंगी, वर्धा येथील विशेषज्ञ डॉक्टर तपासणी करिता येणार आहेत.
दमा (अस्थमा), सिगारेट मुळे झालेले श्वसन विकार, क्षयरोग व क्षयरोगा नंतर होणारे फुफ्फुस विकार, कोरोना मुळे उद्भवलेले फुफ्फुस विकार, लहान मुलांचा दमा, ॲलर्जी मुळे होणारे श्वसन विकार आजाराची तपासणी करण्यात येईल. तसेच श्वसनाच्या समस्यांबाबत चेतावणी देणारे काही लक्षणे आहेत जसे श्वासोच्छवासाशी संबंधित समस्यांच्या सामान्य लक्षणांपैकी एक म्हणजे घरघर. याचा अर्थ असा होऊ शकतो की काहीतरी हवेला सहजतेने जाण्यापासून रोखत आहे. जेव्हा वारंवार छातीत दुखते , तेव्हा ते श्वसनाच्या समस्येचे संकेत देऊ शकते. खोकताना किंवा श्वास घेताना छातीत दुखते असे वाटत असेल तर ते धोक्याचे लक्षण आहे. जर तुम्हाला श्वासोच्छवासाच्या समस्येची लक्षणे असतील जसे की नीट श्वास घेता येत नाही किंवा श्वास घेण्यास त्रास होत असेल तर तुम्हाला श्वसनाचा आजार असू शकतो. खोकल्यापासून रक्त येते तेव्हा ते फुफ्फुसाचा विकार किंवा श्वसन रोगाचे लक्षण आहे. रक्त वरच्या श्वसनमार्गातून किंवा तुमच्या फुफ्फुसातून असू शकते. जुनाट खोकला श्वसनाच्या समस्यांना सूचित करतो. जेव्हा तुम्हाला एक महिना किंवा त्याहून अधिक काळ खोकला येतो तेव्हा याचा अर्थ तुम्हाला दीर्घकाळ खोकला आहे आणि याचा अर्थ तुम्हाला श्वसन प्रणालीची समस्या आहे. जास्त प्रमाणात ठसा येतो तेव्हा फुफ्फुसाचा आजार असू शकतो. तुम्हाला यापैकी कोणतीही लक्षणे आढळल्यास तुम्हाला कदाचित फुफ्फुसाचा संसर्ग किंवा श्वसनाचा आजार आहे. श्वसन विकार ओपीडी मध्ये मोफत आरोग्य तपासणी करण्यात येईल. तसेच वारंवार कान फुटणे, कांनातून पस/पू निघणे, नाकाचे हाड वाकडे होणे, गलगंडाचा त्रास होणे, घश्यातील टॉन्सिल वाढणे, नाकातील मास वाढणे, नाकाचे हाड वाढणे, थॉयरोइडची गाठ वाढणे, तीव्र घसा खवखवणे अशी लक्षणे असल्यास कान, नाक, घसा ओपीडी मध्ये मोफत आरोग्य तपासणी करणात येईल.
गडचिरोली जिल्हातील ग्रामीण व आदिवासी गरजू रुग्णांकरिता उत्कृष्ट दर्जाची आरोग्य सुविधा पुरविण्याच्या उद्देशाने सर्च रुग्णालय विशेष आर्थिक सुविधा देत आहे. ओपीडीमध्ये ईसीजी, एक्सरे व प्रयोगशाळा तपासणी तसेच डॉक्टरांनी लिहून दिलेल्या औषधांवर ५०% सवलत प्रदान करित आहे. श्वसन विकार आणि कान, नाक, घसा ओपीडी ही दर महिन्याच्या चौथ्या बुधवारला नियोजित असून दिनांक- २४ जुलै २०२४ रोजी जास्तीत जास्त रुग्णांनी सर्च रुग्णालयात येऊन आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन सर्च रुग्णालय करीत आहे. येताना आधारकार्ड व रेशन कार्ड सोबत घेऊन यावे.

(#thegdv #thegadvishva #gadchirolilocalnews #gadchirolinews #muktipath )

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here