धानोरा : कोरेगाव नजीक झाडे पडल्याने वाहतूक ठप्प

119

कोरेगाव नजीक झाडे पडल्याने वाहतूक ठप्प
The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि. २० : तालुक्यातील रांगी पासून ५ किमी अंतरावर असलेल्या कोरेगाव नजीक रस्त्यावर १९ ऑगस्ट रोजी सायंकाळी झालेल्या
वादळी पावसाने झाडे कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली आहे.
कोरेगाव, विहिरगाव परिसरात काल १९ ऑगस्ट ला दुपारच्या सुमारास अचानक वादळी पाऊस सुरू झाला. त्यात आलेल्या चक्रिवादळाने जंगलातील अनेक झाडे अक्षरक्षा कोलमोडून पडलेले आहेत.
कोरेगाव ते आरमोरी मार्गावर अनेक ठिकाणी झाडे पडल्याचे पाहायला मिळाले. त्यात साग, हिवर,मोह इत्यादी झाडे रस्त्यावर तसेच जंगल परिसरात पडले असल्याचे दिसून आले. परिसरात आलेल्या वादळी पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले. सोबतच मोठे झाड रस्त्यावर पडल्याने या मार्गाची वाहतूक बंद झालेली होती. झाड तोडेपर्यंत वाहतूक पूर्णपणे ठप्प झालेली असल्याने रस्त्यावरती वाहनाच्या रांगा लागलेल्या होत्या तर काही वाहनाने मार्ग बदलविताना दिसून आले.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #gadchirolilocalnews dhanora)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here