The गडविश्व
ता. प्र / कुरखेडा, दि. २७ : शहर विचार मंच कुरखेडा, गट ग्रामपंचायत गोठणगांव तसेच आशा हॉस्पिटल नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने जि.प.शाळा गोठणगांव येथे २५ फेब्रुवारीला ह्रदयरोग व अस्थीरोग तपासणी निदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबीरात परीसरातील ३७१ रुग्णांची तपासणी करीत औषधोपचार करण्यात आला तसेच यावेळी जिल्हा परिषद शाळेतील १५४ विद्यार्थांची सिकलसेल, हिमोग्लोबिन व रक्तगट तपासणी करण्यात आली.
कार्यक्रमाचे उदघाटन आम्ही आमच्या आरोग्यासाठी संस्थेचे संयोजक डॉ. सतिश गोगूलवार यांचा हस्ते करण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानी शहर विचार मंचाचे अध्यक्ष माधवदास निरंकारी होते तर प्रमुख अतिथी म्हणून आशा हॉस्पिटल नागपूरचे ह्रदयरोग तज्ञ डॉ.भूषण असाटी, कर्करोग तज्ञ डॉ. हिंदूस्थान, जनसंपर्क अधिकारी राहुल राऊत, आरोग्यधाम संस्थेचे डॉ. रमेश कटरे, चांगदेव फाये, सृष्टि संस्थेचे केशव गूरनूले, जि.प. शाळेचे मूख्याध्यापक कपूरचंद उंदीरवाडे, पोलीस पाटील नेवारे, माधव तलमले आदि उपस्थित होते.
शिबीरात नागरीकांची मोफत ह्रदयरोग, अस्थीरोग, कॅंसर, महिलांचे आजार, जनरल तपासणी तसेच शूगर, बिपी महालॅब यांचा वतीने ह्रदय संबंधित रक्त तपासणी, मुत्र, मुत्रपींड व मुत्रमार्ग विकार तपासणी करीत मोफत औषध वितरण करण्यात आले. शिबीरात तपासणी दरम्यान ह्रदयरोग, कॅंसर व कीडनी स्टोनचा गंभीर त्रास असलेले १५ रुग्ण आढळून आले त्याना शहर विचार मंचाच्या सहकार्याने शासकीय योजने अंतर्गत मोफत उपचाराकरीता नागपुर येथे पाठविण्यात येणार आहे.
यावेळी डॉ. भूषण असाटी यांनी मार्गदर्शन करताना आरोग्याच्या सुविधा सर्वसामान्याना उपलब्ध व्हावे म्हणून शासनाने विविध आरोग्य दायी योजना सूरू केलेल्या आहेत याची माहिती व लाभ घेत आपले आरोग्य जपावे असे सांगीतले तर डॉ. सतिश गोगूलवार यांनी बदलत्या जिवन शैलीमूळे आरोग्याचा अनेक गंभीर समस्या उदभवत आहेत याकडे दूर्लक्ष न करता वेळीच तपासणी व औषधोपचार करण्याचे आवाहन त्यानी केले. शिबीराचा यशस्वीतेकरीता गोठणगांवचे उपसरपंच राम लांजेवार, डॉ. जगदीश बोरकर, स्त्री रोग तज्ञ डॉ.प्राजक्ता दुपारे, शहर विचार मंचाचे सचिव उल्हास महाजन, कोषाध्यक्ष रविन्द्र गोटेफोडे, मोहन मनूजा, जिवन पाटील नाट, बबलू हूसैनी, प्रा. कीशोर खोपे, प्रा.डॉ.दशरथ आदे, प्रा. डॉ. नरेंद्र आरेकर, जावेद शेख, प्रा. विनोद नागपूरकर, पूरषोत्तम मडावी, ग्रामसेवक विनोद धाईत, शिक्षक विलास बंसोड, आसिफ़ शेख, रोहित ढवळे, योगीता मडावी, ममता गिरडकर, पूष्पराज रहांगडाले, प्रयोगशाळा तंत्रज्ञ रश्मी मोगरे, सिकलसेल तंत्रज्ञ मेघा वलथरे, प्रयोगशाळा वैज्ञानिक सुप्रीया सहारे, टीकेश्वरी करमकार, चंदू बंसोड, साक्षी कांबळे, साहायक शिक्षक संतोष मेश्राम, नंदेश्वर, शिक्षीका कूंदा गहाणे, ग्रामपंचायत कर्मचारी ईश्वर बोदेले, संदीप कांबळी यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक राम लांजेवार, संचालन प्रा.विनोद नागपूरकर तर आभार प्रदर्शन रविन्द्र गोटेफोडे यांनी मानले.