– मुलांनी जंगलालगत लावले दोनशे रोपटे
The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि. २० : तालुक्यातील वनपरिक्षेत्र अधिकारी उत्तर धानोरा, व वन क्षेत्र सहाय्यक रांगी आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रांगी यांच्या संयुक्त विद्यमाने २०० रोपट्यांची लागवड करण्यात आली. ‘एक पेड माँ के नाम’ अभियान राबविण्यात आले. या उपक्रमा अंतर्गत रांगी ते गडचिरोली रोड लगत पहाडी जवळ कक्ष क्रमांक ४३६ मध्ये २०० वृक्षांची लागवड करून वृक्षारोपणाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला.
वृक्ष लागवडी करिता जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रांगी येथील विद्यार्थी विद्यार्थिनी व मुख्याध्यापक शिक्षक वृंद उपस्थित होते. गावातील प्रतिष्ठित नागरिक देवा कुणघाडकर अध्यक्ष संयुक्त वन व्यवस्थापन समिती रांगी, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे वनपरिक्षेत्र अधिकारी मेडेवार वनपरिक्षेत्र अधिकारी उत्तर धानोरा, क्षेत्र सहायक रामगुंडेवार मोहुर्ले मॅडम, जी. के .कोडाप, एम एम राऊत, मोहली येथील क्षेत्र सहाय्यक, मुस्का येथील क्षेत्र सहायक व वन परिक्षेञातील सर्व कर्मचारी रुंद उपस्थित होते.
यावेळी विविध जातीच्या वृक्षांच्या रोपांची लागवड करण्यात आली. उपस्थितांनी झाडा विषयी व भारत सरकारच्या ‘एक पेड माँ के नाम’ अभियाना विषयी माहिती दिली. कार्यक्रमाचे संचालन काटेंगे जिल्हा परिषद शाळा रांगी यांनी तर आभार अंजुम शेख मुख्याध्यापक यांनी केले.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolilocalnews #dhanora )