– गडचिरोली येथील महाराजा लॉन मध्ये दोन दिवसीय देशातील पहीले आदिवासी महीला साहित्य संमेलन थाटात
The गडविश्व
गडचिरोली, १६ एप्रिल : आदिवासींची साहित्याची निर्मिती फार पूर्वी पासूनच असुन या साहित्याची निर्मिती निसर्गातूनच झाली आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काँग्रेसचे अध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांनी केले. गडचिरोली येथील धानोरा मार्गावरील महाराजा लॉन येथे १५ व १६ एप्रिल २०२३ रोजी दोन दिवसीय देशातील पहीले आदिवासी महीला साहित्य संमेलन थाटात पार पडले यावेळी ते बोलत होते.
पुढे बोलतांना माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी म्हणाले की, साहित्यामध्ये विविध प्रकार आहेत, आदिवासीच्या साहित्याची निर्मिती प्रामुख्याने ही निसर्गातूनच झाली आहे. जल, जंगल, जमीन यामध्ये नदीनाले, पशुपक्षी व डोंगर पहाड अश्या विविध पद्धतीने वास्तव्यास आहे. ते सर्व आदिवासी साहित्यामध्ये दडलेल आहे. पशुपक्षी यांचा आवाज म्हणजे मानव जातीला आव्हान किंवा माहिती देत असतो. आदिवासी साहित्य अलिखित असून, आदिवासी साहित्याचा प्रकार फार पूर्वी पासूनच सुरु आहे. यातुन आदिवासींची साहित्य निर्मित झाली आहे. आदिवासींचे साहित्य हे समाजाच्या सर्वांगीण विकासाला महत्त्वपूर्ण योगदान ठरत आहे. यावेळी आदिवासी महीला भगिनी व खुप मोठ्या संख्येने आदिवासी बांधव उपस्थित होते.
या साहित्याचे अध्यक्ष मेघालय येथील डॉ. प्रा. स्टीमलेट डखार, साहित्य संमेलनाचे उद्घाटन धुळे येथील नजुबाई गावित यांच्या हस्ते झाले. स्वागताध्यक्ष म्हणून माजी आमदार हिरामण वरखडे, साहित्यिका तथा आयोजक कुसुम आलम, प्रमुख अतिथी म्हणून गुजरात येथील अशोकभाई चौधरी, आदिवासीं साहित्यिक वाहरू सोनवणे, दिल्ली येथील निकोलस वारेला, जेष्ठ पत्रकार रोहिदास राऊत, मनोहर हेपट, साहित्यिका उषाताई, डाहाआरा, सामाजिक संस्थेच्या संचालिका शुभदा देशमुख, डॉ सतीश गोगुलवार, प्रा. डॉ. मेघराज कपूर, दलीत व आदिवासी नेते अशोक श्रीमाळी, नंदाबाई आदी मान्यवर तसेच आदिवासी महिला, आदिवासीं बांधव खुप मोठ्या संख्येने उपस्थित होते.
(The gadvishva) (the gdv) (gadchiroli news updates) (Former MlA dr. Namdeo usendi) (adivasi samelan gadchiroli)