मुरुमगाव येथे आदिवासी एकता व शक्ति दिवस साजरा

215

The गडविश्व
ता. प्रा / धानोरा, २७ डिसेंबर : तालुक्यातील मुरुमगाव येथील हलबा हलबी समाज सभागृहात सोमवार २६ डिसेंबर रोजी आदिवासी हलबा हलबी समाज संघटना ब्लॉक मुरुमगाव/ व क्षेत्रीय सर्कल अंतर्गत एकता व शक्ति दिवस साजरा करण्यात आले.
या काय॔क्रमाचे उदघाटक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस महासचिव गडचिरोली जिल्हा प्रभारी डॉ. नामदेव किरसान व कार्यक्रमाचे अध्यक्ष ब्लॉक न्याय समिती अध्यक्ष जयलाल मार्गीया व प्रमुख अतिथी छत्तीसगढ राज्य बालोद महासभा अध्यक्ष मदन बढई, माजी पं. स. सभापती अजमन मायाराम रावटे, मुरुमगाव
गोंड समाज अध्यक्ष नरेंद्र आत्राम, सर्कल अध्यक्ष माहारसिगं फरेदिया मुरुमगाव, सर्कल अध्यक्ष रमेश भैसारा बेलगावं, सर्कल अध्यक्ष श्रीराम राऊत कूलभटी, मुरुमगाव ग्रामपंचायत सरपंच शिवप्रसाद गवरना, मुरुमगावचे ग्रामसेवक आखाडे, मुरुमगाव उपसरपंच मथनूराम मलिया, ब्लॉक उपाध्यक्ष बैसाकूराम कोटपरिया मुरुमगाव, काय॔थयक्ष बालापूरे, कोषाध्यक्ष मनोहर चावरे, सचिव शूरेश नाईक, तालूका पत्रकार मो.शरीफ भाई कुरैशी, पन्नेमारा सरपंच हरीश धुर्वे, कचरूराम पटेल, वसंत कोलीयारा, अमरू बढई, बाजीराव राऊत, भावनाताई गावरकर, इत्यादी उपस्थित होते.
या काय॔क्रमात डाॅ. नामदेव किरसान, फरेंद्र किर्तीकर, मदन बढई, भावनाताई गावरकर, शूरेश नाईक, अजमन मायाराम राऊत, जयलाल मार्गीया,
पत्रकार मो.शरीफ भाई कूरैशी यांनी सामाजिक दृष्टिकोनातून एकत्रीकरण व समाजातील प्रत्येक व्यक्तीचा विकास व शिक्षण व संशोधन, आरोग्य क्रीडा क्षेत्रातील अनेक महत्त्व पटवून देण्यात आले समाजाचे विकास तरच गावाचै व देशाचे विकास घडवून येनार यावर मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमात हजारोच्या संख्येत पुरूष व महिलांनी सहभाग घेतला. या कार्यक्रमात शालेय विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक रंगारंग कार्यक्रम नृत्य सादर केला. कार्यक्रमाला यशस्वीरित्या पार पाडण्याकरीता डी.डी.कवलीया, महेंद्र कुमार ताराम, ड्रापसिंग चिराम, येलसिगं मलिया, सोनसिगं धनगून, बैसाकूराम कोटपरिया, बरसादूराम चिराम, यांनी परिपूर्ण सहयोग केले.
या काय॔क्रमाचे आयोजन हलबा, हलबी समाजाने केला व कर्यक्रमाचे संचालन सरादू ईतवारी चिराम यांनी तर आभार प्रदर्शन डी.डी.कवलीया यांनी मानले. कार्यक्रमानंतर जेवनाचे आयोजन करण्यात आले होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here