गडचिरोलीत उद्या भव्य तिरंगा बाईक रॅली

150

– रॅलीमध्ये सहभागी होण्याचे आमदार डॉ. देवराव होळी यांचे आवाहन
The गडविश्व
गडचिरोली दि.१४ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हर घर तिरंगा अभियानांतर्गत संपूर्ण देशभरात तिरंगा महोत्सव सुरू असून त्याच प्रेरणेने गडचिरोली शहरात उद्या १५ ऑगस्ट रोजी भव्य तिरंगा बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या तिरंगा बाईक रॅली मध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आमदार डॉ. देवराव होळी यांनी केले आहे. सदर तिरंगा रॅली आमदार डॉ. देवराव होळी यांच्या जनसंपर्क कार्यालयातून सकाळी १०:३० वाजता सुरू करण्यात येणार आहे.

असा’असेल रॅली चा मार्ग

रॅली एकत्रीकरण व शुभारंभ आमदार डॉ. देवराव होळी यांचे जनसंपर्क कार्यालय गडचिरोली – इंदिरा गांधी चौक यू टर्न – धानोरा रोड – शिवाजी महाविद्यालय – संघ कार्यालय – रेड्डी गोडाऊन – चामोर्शी रोड – सायन्स कॉलेज गोकुळनगर बायपास रोड – आयटीआय चौक – कारगिल चौक – इंदिरा गांधी चौक त्यानंतर आमदार डॉ. होळी यांच्या जनसंपर्क कार्यालयात रॅलीचा समारोप करण्यात येणार आहे.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #mladr.holi)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here