गडचिरोली : दोन जहाल महिला नक्षलींसह एका जनमिलिशीयास अटक

3448

– शासनाने जाहिर केले होते साडेपाच लाख रुपयांचे बक्षिस
The गडविश्व
गडचिरोली, दि. ०७ : टीसीओसी कालावधीच्या तसेच आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक -२०२४ च्या पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलीस दलाने सुरक्षा दलांविरुद्धच्या अनेक हिंसक घटनांमध्ये सक्रिय सहभाग असलेल्या दोन जहाल महिला माओवाद्यास व टिटोळा गावातील एका निरपराध इसमाच्या हत्येमध्ये सहभागी असलेल्या एका जनमिलिशीयास आज ७ एप्रिल रोजी अटक केली. काजल ऊर्फ सिंधू गावडे (वय २८ ) रा. कचलेर तह. एटापल्ली, जि. गडचिरोली, गीता ऊर्फ सुकली कोरचा (वय ३१) रा. रामनटोला, तह. एटापल्ली जि. गडचिरोली असे महिला नक्षलींची नावे असून पिसा पांडू नरोटे रा. झारेवाडा, तह. एटापल्ली, जि. गडचिरोली असे अटक करण्यात आलेल्या जनमिलिशीयाचे नाव आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या दोन्ही महिला नक्षली ह्या गडचिरोली-कांकेर (छ.ग.) सिमेवरील पोस्टे पिपली बुर्गी हद्दीतील जवेली जंगल परिसरात संशयितरित्या फिरत आहेत अशा मिळालेल्या गोपनिय माहितीच्या आधारे विशेष अभियान पथकाचे जवान, पोस्टे पिपली बुर्गी पोस्ट पार्टीचे जवान तसेच केंद्रीय राखीव पोलीस बल जी -१९२ बटा. च्या जवानांनी सदर जंगल परिसरात नक्षलविरोधी अभियान राबवून त्यांना ताब्यात घेतले. दरम्यान त्यांचा अधिक तपासात केला असता सन २०२० मध्ये कोपर्शी – पोयारकोटी जंगल परिसरात पोलीस – नक्षल चकमक झाली ज्यात गडचिरोली पोलीस दलातील एक अधिकारी व एक जवान शहिद झाले होते. सदर चकमकीत त्यांचा प्रत्यक्ष सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना सदर चकमकीच्या अनुषंगाने पोस्टे भामरागड येथे दाखल कलम 302, 307, 353, 332, 143, 147, 148, 149, 120 (ब) भादवि, सहकलम 5/27, 5/28 भाहका, 3,4 भास्फोका मध्ये अटक करण्यात आलेली आहे. यासोबतच मागील २०२३ मध्ये टिटोळा ते पामाजीगुडा जंगल परिसरात झालेल्या नोव्हेंबर २०२३ मध्ये टिटोळा पोलीस पाटीलाच्या हत्येच्या अनुषंगाने पोस्टे एटापल्ली येथे दाखल गुन्ह्रातील पाहिजे असलेला आरोपी जनमिलिशीया पिसा पांडू नरोटे, रा. झारेवाडा, तह. एटापल्ली, जि. गडचिरोली हा गुन्हा घडल्यापासून फरार होता. तो गिलनगुडा जंगल परिसरात लपून बसलेला असल्याच्या मिळालेल्या गोपनिय माहितीच्या आधारे पोस्टे गट्टा (जां.) पोस्ट पार्टी व केंद्रीय राखीव पोलीस बल ई -१९१ बटा. च्या जवानांनी विशेष अभियान राबवून त्यास पोस्टे एटापल्ली येथे कलम 302, 364, 143, 147, 148, 149, 120 (ब) भादवि. सहकलम 3/25 भाहका, 135 मपोका या गुन्ह्रामध्ये आज रोजी ताब्यात घेऊन अटक करण्याची प्रक्रिया चालु आहे.

काजल ऊर्फ सिंधू गावडे हि २०१२ मध्ये प्लाटुन क्र. ५५ मध्ये सदस्य या पदावर भरती होऊन सन २०१९ पर्यंत कार्यरत होती. २०१९ मध्ये कंपनी क्र. ०४ मध्ये बदली होऊन २०२० पर्यंत सदस्य पदावर कार्यरत होती. २०२० पासुन डीव्हीसी (डिव्हीजनल कमीटी) स्टाफ टीम/प्रेस टीम मध्ये सदस्य पदावर आतापर्यंत कार्यरत होती. तिच्यावर ७ चकमक व इतर दोन असे गुन्हे दाखल होते. त्यात २०१९ मध्ये नारकसा, दराची-सिंदेसुर, बोधीनटोला जंगल चकमक, २०२० मध्ये किसनेली पहाडी जंगल चकमक, २०२१ मध्ये फुलकोडो, खोब्राामेंढा, मोरचूल जंगल परिसरात झालेल्या चकमकीमध्ये तिचा सहभाग होता. तर २०१९ मध्ये कनेली व पुसेर साखरदेव जंगल परिसरातील जमिनीत स्फोटके पुरुन ठेवण्यात तिचा प्रत्यक्ष सहभाग होता. शासनाने हिच्या अटकेवर ०२ लाख रूपयाचे बक्षीस जाहिर केले होते.

गीता ऊर्फ सुकली कोरचा हि २०१८ मध्ये भामरागड दलममध्ये सदस्य पदावर भरती होऊन सप्टेंबर २०२० पर्यंत कार्यरत होती. सप्टेंबर २०२० मध्ये माड एरीया मध्ये बदली होऊन सदस्य पदावर आतापर्यंत कार्यरत होती. तिच्यावर ३ चकमक, २ खून असे गुन्हे दाखल होते. त्यात २०१९ मध्ये मोरोमेट्टा – नेलगुंडा जंगल चकमक,२०२० मध्ये कोपर्शी-पोयारकोटी जंगल परिसरात झालेल्या चकमकीमध्ये गडचिरोली पोलीस दलातील एक अधिकारी व एक जवान शहिद झाले होते त्यात तिचा सहभाग होता तसेच २०२१ मध्ये कोपर्शी जंगल परिसरात पोलीसांसोबत झालेल्या चकमकीमध्ये तिचा सहभाग होता.
तिच्यावर २०२० मध्ये कोठी येथे झालेल्या एका पोलीस जवानाच्या हत्येमध्ये व २०२१ मध्ये कोठी ते भामरागड रोडवर झालेल्या एका निरपराध इसमाच्या हत्येमध्ये तिचा सहभाग होता. शासनाने हिच्या अटकेवर ०२ लाख रूपयाचे बक्षीस जाहिर केले होते.

जनमिलिशीया पिसा पांडू नरोटे हा २०१८ पासुन गावात राहुन जनमिलिशीया म्हणून नक्षल्यांसाठी राशन आणून देणे, सेंट्री ड्युटी करणे, नक्षल्यांचे हत्यार लपवून सुरक्षीत ठिकाणी ठेवणे, निरपराध इसमांचे खून करण्याआधी रेकी करुन त्याची माहिती नक्षल्यांस पुरविणे, पोलीस पार्टीबद्दल माहिती देणे तसेच नक्षल्यांचे पत्रके जनतेपर्यत पोहचविणे व इतर काम करीत होता. २०२१ पासून जनमिलिशीया कमांडर म्हणून काम करीत होता.
त्याच्या या कार्यकाळात २०२२ मध्ये झारेवाडा येथील निरपराध इसमाच्या खुनात त्याचा प्रत्यक्ष सहभाग होता. २०२२ मध्ये गोरगुट्टा येथील निरपराध इसमाच्या खुनात त्याचा प्रत्यक्ष सहभाग होता. २०२३ मध्ये टिटोळा ते पामाजीगुडा जंगल परिसरात झालेल्या टिटोळा पोलीस पाटलाच्या हत्येमध्ये त्याचा प्रत्यक्ष सहभाग होता.तसेच २०१९ मधील लोकसभा निवडणूकीदरम्यान टिटोळा गावात स्फोटके जमिनीत पुरुन ठेवण्यात नक्षल्यांना मदत केली होती. शासनाने याच्या अटकेवर १.५ लाख रूपयाचे बक्षीस जाहिर केले होते.

गडचिरोली पोलीस दलाच्या प्रभावी कारवाईमुळे जानेवारी २०२२ ते आतापर्यंत एकुण ७७ नक्षल्यांना अटक करण्यात गडचिरोली पोलीस दलास यश आलेले आहे. सदरच्या दोन्ही कारवाया पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक, अहेरी एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली सीआरपीएफचे ई-१९१ बटा. चे असीस्टंट कमांडेन्ट मोहित कुमार, सीआरपीएफ जी-१९२ बटा. चे असीस्टंट कमांडेन्ट दिपक दास, पोस्टे पिपली बुर्गीचे प्रभारी अधिकारी वैभव रुपवते, पोस्टे गट्टा (जां.) चे प्रभारी अधिकारी चेतन परदेशी तसेच विशेष अभियान पथकाच्या जवानांनी पार पडली. तसेच पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी नक्षल्यांना माओवादाची हिंसक वाट सोडुन आत्मसमर्पण करुन सन्मानाने जीवन जगण्याचे आवाहन केले आहे.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #naxalarrest )

————————————————————————————–

GADCHIROLI POLICE ARRESTS TWO HARDCORE FEMALE MAOISTS AND ONE JAN MILITIA CARRYING RS. 5.50 LAKHS REWARD

-Government of Maharashtra had announced a total reward of Rs. 5.50 lakhs for their arrest
The Gadvishva
Gadchiroli, 07 : CPI (Maoists) are observing their Tactical Counter Offensive Campaign from February to May 2024. During this TCOC period in which various violent incidents against security forces are being planned in the backdrop of the upcoming Lok Sabha General Elections 2024, Gadchiroli Police has arrested two active female Maoists involved in several violent incidents against security forces, as well as one Jan Militia member who was involved in the murder of a Police Patil in Titola Village in November 2023. They all have been apprehended on April 7, 2024.

With the objective of conducting disruptive activities and to conduct recci of movement of security forces on the eve of the upcoming General Elections 2024, information was recieved that two female Maoists, namely 1) Kajal alias Sindhu Gawade, 28Y, R/o Kachler, Teh:- Etapalli, Distt:- Gadchiroli, and 2) Geeta alias Sukli Korcha, 31Y, R/o Ramantola, Teh:- Etapalli, Distt.- Gadchiroli were roaming suspiciously in the dense forests of Mouza Javeli under justification of P.S. Pipali Burgi on Gadchiroli- Kanker Border. Based on confidential information received, immediately a joint team of C-60 personnel, Pipali Burgi Post Party and the Central Reserve Police Force (CRPF) G-192 Battalion was launched who apprehended them while conducting the area search . Further investigation revealed that in the year 2020, in the Koparshi-Poyarkoti forest area, they were directly involved in planning ambush and an exchange of fire between the Police and Maoists in which an officer and men of C60 had attained martyrdom. Accordingly, they have been arrested today in connection with crime no. 19/2020 registered at PS Bhamragadh U/s 302, 307, 353, 332, 143, 147, 148, 149, 120 (b) of the IPC, 5/27, 5/28 of the Indian Armed Act, and Sec 3/4 of the Indian Explosive Act.

In the previous year, in 2023, Police Patil of Titoda village was murdered in Titola Pamajiguda forest area in November 2023. The accused, a Jan Militia member named Pisa Pandu Narote, resident of Zarewada, Tehsil Etapalli, Dist. Gadchiroli, was on the run since the incident. Based on a confidential information received, that the accused is hiding in Gilanguda forest area patch, personnel’s from Gatta (Ja.) Post Party and the Central Reserve Police Force E-191 Battalion conducted a special operation immediately and the accused was apprehended from that area and is being arrested in connection with crime no. 76/2023 registered at PS Etapalli charged U/s 302, 364, 143, 147, 148, 149, 120 (b) of IPC, and sections 3/25 Indian Armed Act and 135 of the MPA.

Information about the Arrested female Maoist:

1. Name: Kajal @ Sindhu Gawade

Tenure in Maoist Organization:

 In 2012, she was recruited as a member of Platoon No. 55 and worked 2019.
 In 2019, she was transferred to Coy. No. 4 and worked as a member till 2020.
 Since 2020, she has been working as a member of the DVC (Divisional Committee) Staff Team/Press Team till date.

Offences committed by her

Encounters – 07

-In 2019, she was involved in an exchange of fire with Police in the Narkasa forest area.
-In 2019, she was involved in an exchange of fire with Police in the Darachi Sindesur forest area.
-In 2019, she was involved in an exchange of fire with Police in the Bodhintola forest area.
-In 2020, she was involved in an exchange of fire with Police in the Kisneli mountain forest area.
-In 2021, she was involved in an exchange of fire with Police in the Fulkodo forest area.
-In 2021, she was involved in an exchange of fire with Police in the Khobramendha forest area.
-In 2021, she was involved in an exchange of fire with Police in the Morchul forest area.

Others – 02

-In 2019, she was directly involved in planting IED in Mauja Kaneli forest area.
-In 2019, she was directly involved in planting IED in Puser Sakhardev forest area.

2. Name: Geeta @ Sukli Korcha

Tenure in Maoist Organization:

-In 2018, she was recruited as a member of Bhamragadh LOS and worked till Sept. 2020.
-In Sept. 2020, she was transferred to Maad area and worked as a member till.

Offences committed during her tenure:

Encounters – 03

-In 2019, she was involved in an exchange of fire with Police in the Morometta – Nelgunda forest area.
-In 2020, she was involved in planning an ambush and an exchange of fire with Police in the Koparshi – Poyarkoti forest area. In this exchange of fire one officer and one men of C60 were martyred.
-In 2021, she was involved in an exchange of fire with Police in the Koparshi forest area.

Murder – 02

-In 2020, she was directly involved in the murder of a policemen at Kothi.
 In 2021, she was involved in the murder of an innocent person on the road from Kothi to Bhamragadh.

3. Jan Militia Name: Pisa Pandu Narote

Tenure in Maoist Organization:

Since 2018, he has been living in the village as Jan militia. His tasks included bringing rations to the Maoists, performing sentry duty, hiding the Maoists’ weapons in secure locations, providing information to the Maoists through reconnaissance about police movements, distributing Maoist pamphlets to the public, and undertaking other subversive activities.

Since 2021, he has worked as a Jan Militia Commander.

Offences committed during his tenure:

Murder – 03

-In 2022, he was involved in the murder of an innocent civilian of Zarewada.
-In 2022, he was involved in the murder of an innocent civilian of Gorgutta.
-In 2023, he was involved in the murder of a Police Patil of Titoda village on the road from Titoda to Pamajiguda.

Other – 01

-During the Loksabha General Election 2019, he assisted the Maoists in planting explosives in the village of Mauja Titoda.

-Rewards on above arrests:

-Government of Maharashtra had announced a reward of Rs. 02 lakhs for Kajal alias Sindhu Gawade arrest.
-Government of Maharashtra had announced a reward of Rs. 02 lakhs for Geeta alias Sukli Korcha arrest.
-Government of Maharashtra had announced a reward of Rs. 1.5 lakhs for Pisa Pandu Narote arrest.

Due to the intensified operations conducted by the Gadchiroli Police, a total of 77 hardcore Maoists have been arrested since January 2022. This action was undertaken under the guidance of Neelotpal, Superintendent of Police, Gadchiroli, Yatish Deshmukh, Addl. Supdt. Of Police (Ops.), Kumar Chintha, Addl. Supdt. Of Police (Admin.), M. Ramesh, Addl. Supdt. Of Police, Aheri and Officer Commanding E/191 Mohit Kumar AC, G-192 Dipak Das AC, PSI Chetan Pardeshi, Incharge of PS Gatta (Ja.), PSI Vaibhav Rupvate, Incharge of PS Pipali Burgi and C-60 personnel. Furthermore, Shri. Neelotpal, SP Gadchiroli, has appealed to active Maoist cadres to renounce the path of violence and surrender in order to live their lives with dignity.

(#thegdv #thegadvishva #gadchirolipolice #gadchirolinews #naxalarrest )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here