– महिला माओवादीचा समावेश, ०८ लाखांचे बक्षीस जाहीर
The गडविश्व
गडचिरोली, दि. ०५ : जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील दिरंगी-फुलनार जंगल परिसरात फेब्रुवारी २०२५ मध्ये झालेल्या चकमकीमध्ये सक्रिय सहभाग असलेल्या दोन जहाल माओवाद्यांना गडचिरोली पोलीस दल व सिआरपीएफने आज ०५ मार्च रोजी अटक केली आहे. या चकमकीत एका सी – ६० जवानाचा मृत्यू झाला होता. केलु पांडुू मडकाम ऊर्फ दोळवा, (पीपीसीएम, कंपनी क्र. २०), (वय २६) रा. मुरकुम, पोस्टे- तर्रेम, तह. उसूर जि. बिजापूर (छ.ग.), रमा दोहे कोरचा ऊर्फ डुम्मी (पार्टी सदस्य, भामरागड दलम), (वय ३२) वर्षे रा. मेंढरी, तह. एटापल्ली, जि. गडचिरोली
असे अटक करण्यात आलेल्या माओवाद्यांची नावे आहेत.
उपविभाग भामरागड अंतर्गत पोस्टे भामरागड हद्दीतील आरेवाडा जंगल परिसरामध्ये पोस्टे भामरागड येथील पोलीस पथक व 37 बटा. सिआरपीएफचे पथक माओवादविरोधी अभियान राबवित असताना त्यांना दोन संशयित व्यक्ती फिरत असताना आढळून आल्याने पथकाच्या जवानांनी त्यांना ताब्यात घेतले होते. त्यांनंतर अधिक सखोल चौकशी करण्यासाठी पोलीस मुख्यालय गडचिरोली येथे आणले असता,अधिक चौकशी दरम्यान सदर दोन्ही व्यक्ती हे पोलीसांच्या अभिलेखावरील जहाल माओवादी असून घातपात घडवून आणण्याच्या उद्देशाने ते आरेवाडा जंगल परिसरात रेकी करण्यासाठी दाखल झाले होते. तसेच या दोन्ही माओवाद्यांंचा ११ फेब्राुवारी २०२५ रोजी दिरंगी-फुलनार जंगल परिसरात झालेल्या चकमकीमध्ये एका पोलीस जवानाच्या हत्येमध्ये प्रत्यक्ष सहभाग होता. असे निष्पन्न झाल्याने त्यांना पोस्टे कोठी येथे त्या अनुषंगाने दाखल अप क्र. 01/2025 कलम 103, 109, 121 (1), 132, 189(2), 190, 191 (2), 61 भा.न्या.स., सहकलम 25, 27, 3, 5 भाहका, कलम 3, 4, 5, भास्फोका, सहकलम 13, 16, 18, 20, 23 बेकायदा कृत्य अधि. व सहकलम 135 महा. पो. अधि. या गुन्ह्रात आज अटक करण्यात आली आहे.
केलु पांडू मडकाम ऊर्फ दोळवा हे 2016 मध्ये पामेड दलममध्ये सदस्य पदावर भरती होऊन सन 2017 पर्यंत काम केले. 2017 मध्ये सिसिएम मिलींद तेलतुंबडे च्या गार्डमध्ये बदली होऊन 2021 पर्यंत काम केले. 2021 मध्ये मर्दिनटोला चकमकीमध्ये जखमी झाल्याने माड एरीयातील काकुर जंगल परिसरात राहुन फेब्राुवारी 2022 पर्यंत उपचार घेतले. फेब्रुवारी 2022 पासून पश्चिम ब्युरो स्टाफ टिममध्ये आवश्यकतेनुसार डिकेएसझेडसी रुपेश व प्रभाकर यांचे सोबत ऑगस्ट 2023 पर्यंत काम केले. ऑगस्ट 2023 मध्ये कंपनी क्र. 10 मध्ये बदली होऊन एप्रिल 2024 पर्यंत काम केले. एप्रिल 2024 पासून डिकेएसझेडसी प्रभाकर व कंपनी क्र. 10 मध्ये आवश्यकतेनुसार डिसेंबर 2024 पर्यंत काम केले. डिसेंबर 2024 मध्ये पीपीसीएम (प्लाटुन पार्टी कमिटी मेंबर) पदावर पदोन्नती होऊन कंपनी क्र. 10 मध्ये आजपावेतो काम केले.
त्याचा आजपर्यंत एकुण 05 गुन्ह्रांमध्ये सहभाग असून त्यामध्ये 04 चकमक, व 01 जाळपोळ या गुन्ह्रांचा समावेश आहे.

रमा दोहे कोरचा ऊर्फ डुम्मी ही 2011 पासून चेतना नाटयमंच मध्ये भरती होऊन 2013 पर्यंत काम केले. 2013 पासून सन 2023 पर्यंत गट्टा दलममध्ये सदस्य पदावर काम करत होती. 2023 मध्ये भामरागड दलममध्ये बदली होऊन आजपावेतो कार्यरत होती.
तिच्यावर आजपर्यंत एकुण 12 गुन्हे दाखल असून त्यामध्ये 08 चकमक व 04 खून इ. गुन्ह्रांचा समावेश आहे.
शासनाने जाहिर केलेले बक्षीस.
महाराष्ट्र शासनाने केलु पांडुू मडकाम ऊर्फ दोळवा याच्या अटकेवर 06 लाख रूपयाचे तर रमा दोहे कोरचा ऊर्फ डुम्मी हिच्या अटकेवर 02 लाख रूपयाचे बक्षीस जाहिर केले होते.
गडचिरोली पोलीस दलाच्या प्रभावी कारवाईमुळे माहे जानेवारी 2022 ते आतापर्यंत एकुण 92 माओवाद्यांना अटक करण्यात गडचिरोली पोलीस दलास यश आलेले आहे.
सदरची कारवाई विशेष पोलीस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) संदिप पाटील, पोलीस उप-महानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र अंकित गोयल, पोलीस अधीक्षक गडचिरोली नीलोत्पल, दाओ इंजिरकान कींडो, कमांडंट 37 बटा. सिआरपीएफ, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) एम. रमेश, पोलीस उप-अधीक्षक (अभियान) विशाल नागरगोजे व उपविभागीय पोलीस अधिकारी भामरागड अमर मोहिते यांचे मार्गदर्शनाखाली पोस्टे भामरागड येथील जवानांनी पार पाडली. तसेच पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी माओवाद्यांना माओवादाची हिंसक वाट सोडून आत्मसमर्पण करुन सन्मानाने जीवन जगण्याचे आवाहन केले आहे.