चकमकीत दोन नक्षली ठार

2067

– घटनस्थळावरून एक रायफल आणि भरमार व इतर नक्षली साहित्य जप्त
The गडविश्व
कांकेर, २१ ऑक्टोबर : जिल्ह्यातील कोयलीबेडा क्षेत्रांतर्गत येत असलेल्या केसोकोडी-गोमे जंगल पहाडीवर २० ऑक्टोबर रोजी नक्षल विरोधी अभियान राबवितांना पोलीस नक्षल चकमक उडाली. या चकमकीत दोन नक्षली ठार झाली आहेत. घटनास्थळावरून एक इंसास रायफल, एक भरमार व मोठ्या प्रमाणात इतर नक्षली साहित्य जप्त करण्यात आले.कांकेर जिल्ह्यात नक्षल विरोधी अभियान सतत राबविण्यात येत आहे. कोयलीबेडा पोलीस ठाण्याअंतर्गत केसोकोड़ी, गोमे व त्यानाजीकच्या क्षेत्रात २० ते २५ नक्षली असल्याची गोपनीय माहिती मिळाली असता २० ऑक्टोबर रोजी रात्रोच्या सुमारास डीआरजी, बस्तर फाईटर्स, बीएसएफचे संयुक्त पथक केसोकोडी – गोमे जंगल परिसरात नक्षल विरोधी अभियान राबवित असतांना नक्षल्यानी पोलिसांच्या दिशेने गोळीबार केला. पोलिसांनीही प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला असता या चकमकीत दोन्ही बाजूने गोळीबार सुरू असतांना काही वेळाने नक्षली जंगलाच्या दिशेने पसार झाले. चकमकीनंतर घटनास्थळी झडती घेतली असता दोन नक्षली ठार झाल्याचे आढळून आले. पोलिसांनी घटनस्थळावरून एक इंसास रायफल, एक भरमार व मोठ्या प्रमाणात इतर नक्षली साहित्य जप्त केले.
सदर कारवाई सुन्दरराज पी. (भा.पु.से.) पोलीस महानिरीक्षक बस्तर रेंज जगदलपुर, बालाजी राव. (भा.पु.से.) पोलीस उप महानिरीक्षक कांकेर रेंज कांकेर चे हरेन्दर पाल सिंह उप महानिरीक्षक बीएसएफ सेक्टर सिंगारभाट कांकेर यांच्या मार्गदर्शनात दिव्यांग पटेल (भा.पु.से.) पोलीस अधीक्षक कांकेर, रमेश राम सेनानी ३० वीं वाहिनी बीएसएफ मुख्यालय कोयलीबेड़ा यांच्या निर्देशनात करण्यात आली.

(cg news, thegadvishva, kanker, naxal police )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here