The गडविश्व
ता प्र / धानोरा, २७ जून : तालुक्यातील रांगी व निमगाव शाळेतील दोन विद्यार्थ्यांची नवोदय विद्यालय करिता निवड झालेली आहे.
धानोरा पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या रांगी केंद्रातील रांगी जिल्हा परिषद केंद्र शाळेतील कुमारी संस्कृती टिकाराम कन्नाके हिची तर निमगाव जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थिनी किशीका केशव खोब्रागडे यांनी उत्कृष्ट गुण प्राप्त करीत नवोदय साठी पात्र ठरले आहेत. दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा रांगी व निमगाव शाळेने उज्वल यशाची परंपरा कायम ठेवली आहे .याबद्दल दोन्ही गावांतील लोकांनी व शिक्षकांनी अभिनंदन केले आहे.