– अंकमवार परिवाराकडून पुढील कार्यासाठी २१ हजार रुपये
The गडविश्व
प्रतिनिधी, ढाणकी (उमरखेड ) : मोक्षधाम समितीच्या या लोकोपयोगी उपक्रमामुळे अनेक दातृत्व करणारे दाते पुढे येत आहेत. आपल्या जवळील व्यक्तीचे निधन झाले म्हणजे कुटुंबाची ती कधीच न भरून निघणारी हानीच असते. समाजात वावरत असताना चांगल्या वाईट अनुभवातून माणूस घडतो पण अंकमवार या परिवाराने समाजातील चांगल्या विचाराच्या नांदीचाच केवळ स्वीकार केला व त्यांनी तेरवीचा व इतर वायफळ खर्चाला बगल देत स्वर्गीय लक्ष्मीबाई हाशन्ना अंकमवार यांच्या प्रित्यर्थ २१ हजार रुपये मोक्षधाम समितीला दिला. नक्कीच अंकमवार कुटुंबाच्या या उपक्रमामुळे समाजातील इतर लोकांना व दातृत्व करणाऱ्या दात्याना प्रेरणा मिळणार आहे.
ढाणकी शहरातील स्मशानभूमीची अवस्था अत्यंत भयावह होती. दिवसा सुद्धा सर्वसामान्य तिथे फिरण्यास व जाण्यास सुद्धा धजावत नव्हते, सुविधांची वाणवा होती, कोणत्याही प्रकारच्या सुविधे विना स्मशानभूमी ओस पडली होती, मृत शरीराला अग्नी देण्यासाठी चे ठिकाण सुद्धा सुरक्षित नव्हते, अंत्यविधीला आलेल्या बाहेर शहरातील मंडळीला बसण्याची किंवा लांब बाहेर शहरातून प्रवासातून अंत्यविधी ला आलेल्या नातेवाईकांना आल्यानंतर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था सुद्धा नव्हती अशा अनेक सुविधांचे माहेरघर शहरातील स्मशानभूमीची अवस्था झाली होती. सायंकाळ झाली म्हणजे स्मशानभूमी कडील भागाकडे भयान शांतता पसरलेली असायची तसेच अनेक श्वानांचे टोळके सुद्धा त्या ठिकाणी असायचे अशा प्रकारची दयनीय अवस्था स्मशानभूमीची झाली होती विविध प्रकारच्या गवतांनी झाडाझुडपांनी व काटेरी झाडांनी परिसराला चारी बाजूंनी वेढा घातला होता.
पण हात फिरेल तिथे लक्ष्मी नांदेल ही मन सत्यात उतरवली ती ढाणकी शहरातील मोक्षधाम समितीतील सुज्ञ कर्तबगार नागरिकांनी ज्या ठिकाणी रात्रीच्या वेळी जायला सुद्धा भीती वाटत होती त्या ठिकाणी रात्रीच्या वेळी लाईट ची व्यवस्था केल्यामुळे परिसराला नंदनवनाचे स्वरूप आले शिवाय तत्कालीन वेळेस जी काटेरी झुडपे होती ती मोक्षदाम समितीने नष्ट केली व अनेक सुंदर मनाला व चित्ताला काही क्षण शांती लाभेल अशा विविध पुष्पांची लागवड केली तसेच अंत्यविधीला लागणारे जे काही सामग्री आहे ती सुद्धा या ठिकाणी मिळण्याची सुविधा उपलब्ध करून ही अडचण पण मोक्षधाम समितीने दूर केली तसेच इथे सुरुवातीला अनेक श्वानांचे टोळके असायचे ते आता दिसत नाही या सर्व बाबीमुळे आजूबाजूंच्या गावांना एक आदर्श ढाणकी शहरातील मोक्षधाम समितीने घालून दिला आहे.
विशेष व येथे एक शंभू महादेवाची सुद्धा मोहक व विलोभनीय मूर्तीची स्थापना करण्यात आली आणि एका चौकीदाराची सुद्धा नेमणूक केली त्यामुळे अनेक बाबींना आळा बसला. अंकमवार परिवाराने समाजातील चांगल्या विचाराच्या नांदीचाच केवळ स्वीकार केला व त्यांनी तेरवीचा व इतर वायफळ खर्चाला बगल देत स्वर्गीय लक्ष्मीबाई हाशन्ना अंकमवार यांच्या प्रित्यर्थ २१ हजार रुपये मोक्षधाम समितीला दिला. नक्कीच अंकमवार कुटुंबाच्या या उपक्रमामुळे समाजातील इतर लोकांना व दातृत्व करणाऱ्या दात्याना प्रेरणा मिळेल. हा निधी सुपूर्द करताना मोक्षदाम समितीचे अध्यक्ष सुभाष कुचेरिया अमोल तुपेकर, माधवराव आर्किलवाड , रमण रावते,मोहनराव कळमकर, बाबुराव नरवाडे, रमेश पराते, गजानन गंजेवाड , उदय पुंडे(जेष्ठ पत्रकार) प्रशांत पंडितकर, गोपाल अंकमवार इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
(The Gadvishva ) (Gadchiroli News Updates) (Muktipath) (Shivratri images) (Cheteshwar Pujara) (Kartik Aaryan Shehzada) (Somvati Amavasya 2023) (Goa) (The Last of Us episode 6) vs Toulouse) (Man United vs Leeds United) (The Gdv) ( Umarkhed: Due to the excellent performance of Dhanki Moksha Dham Samiti, charitable donors are coming forward)