वडसा-ब्रम्हपूरी मुख्य राज्य महामार्गावरील अनाधिकृतरित्या केलेले अतिक्रमण नगर परिषदेद्वारा निष्कासीत

31

The गडविश्व
ता. प्र / देसाईगंज, दि. १० : स्थानिक नगर परिषद अंतर्गत येणाऱ्या वडसा-ब्रम्हपूरी मुख्य रहदारीचे राज्य महामार्गावरील अनाधिकृतरित्या अतिक्रमण केलेल्या अतिक्रमणधारकांना यापुर्वी डिसेंबर २०२४ मध्ये अनधिकृतरित्या केलेले अतिक्रमण काढून टाकण्यासाठी नोटीस देण्यात आले होते. परंतू अतिक्रमण धारकांनी स्वत: अतिक्रमण काढून न टाकल्याने आज १० मार्च २०२५ रोजी नगर परिषदेद्वारा जेसीबीचे सहाय्याने काढून टाकण्याची कार्यवाही करण्यात आली.
देसाईगंज शहराच्या वडसा ब्रम्हपूरी मुख्य रहदारीचे राज्य महामार्गाचे बाजूला अतिक्रमण करुन अनाधिकृतरित्या इमारत/शेडचे बांधकाम केलेले होते. त्यामुळे उक्त मुख्य राज्यमहा मार्गावर वाहने तसेच नागरिकांचे रहदारीस अडथळा निर्माण होऊन अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती व तसे नगर परिषदेचे मौका पाहणी अंती निदर्शनास आलेले होते. त्यामूळे नोटीस नुसार मुख्य रहदारीचे मार्गाचे बाजूला अनाधिकृतरित्या केलेले अवैध अतिक्रमण स्वतः स्वखर्चाने तीन दिवसाचे आंत काढून टाकण्याबाबत नोटीस बजावण्यात आलेले होते. परंतू अतिक्रमण धारकांनी अद्यापपर्यंत सदर मुख्य रहदारीचे मार्गावर अनाधिकृतरित्या केलेले अवैध अतिक्रमण काढून जागा मोकळी केलेली नव्हती. त्यामुळे सदर अतिक्रमण धारकांना अंतीम नोटीस देऊन तिन दिवसाचे आंत सदर राज्यमहा मार्गावर अनाधिकृतरित्या केलेले अवैध अतिक्रमण स्वतः स्वखर्चाने काढून टाकावे. अन्यथा महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, 1966 चे कलम 52,53,54 तसेच महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, 1965 चे कलम 179 अन्वये कार्यवाही करुन सदरचे अनाधिकृत अवैध बांधकाम नगर परिषद यंत्रणे मार्फत काढून साहित्य जप्त करण्यात येईल व या कामी येणारा खर्च अतिक्रमणधारकांकडून दंडाच्या शुल्कासह सक्तीने वसूल करण्यांत येईल व यानंतर आपली कोणतीच उजर तक्रार विचारात घेतली जाणार नाही, याची गांभिर्याने नाँद घेण्याबाबत कळविण्यात आले होते. परंतू सदर अतिक्रमण धारकांनी स्वत:हून अतिक्रमण न काढल्याने नगर परिषदेने जेसीबीच्या सहाय्याने अतिक्रमण निष्काषीत करुन जागा मोकळी करण्यात आली .
अतिक्रमण काढण्याकरीता मुख्याधिकारी डॉ.कुलभुषण रामटेके यांचे नेतृत्वात नगर परिषदेच्या अधिकारी / कर्मचाऱ्यांचे पथक तयार करुन विविध जबादाऱ्या सोपवून सदर कार्यवाही पार पाडली. यामध्ये कार्यालय अधिक्षक प्रमोद येरणे, स्थापत्य अभियंता सौरभ नंदनवार, निशांत घोनमोडे, रचना सहायक कु. दिव्या परतेके, विद्युत अभियंता योगीला निंबार्ते,संगणक अभियंता प्रशांत चिचघरे, कर विभाग प्रमुख स्वप्नील हमाने, कर व प्रशासकिय अधिकारी प्रफुल हटवार, अग्निशमन अधिकारी अनिल गोवर्धन, मानधन कर्मचारी हमीद पठाण, लिपीक मुकेश सोनेकर, रितेश येरणे, दिनकर खेत्रे, सफाई जमादार जवाहर सोनेकर, पाणीपुरवठा अभियंता आशीष गेडाम, लिपीक विनोद मरस्कोल्हे, सफाई कर्मचारी रवि शेंदरे, शैलेश खांडेकर, अमर शेंडे, अरविद इंदूरकर, लिडींग फायरमन राजू निंबेकर, फायरमन सुनिल नाकाडे, शिपाई व्यंकट चौधरी, सफाई कामगार राहुल रगडे, अनुराग सारोटे, लक्की बिरहा इत्यादींनी मोलाची कामगीरी बजावली.
यापुढेही अतिक्रमण काढण्याची कार्यवाही सुरु राहणार आहे. त्यामुळे रहदारीला अथडळा होईल व नागरीकांना विनाकारण त्रास होईल, अशा सर्व ठिकाणी अनधिकृत अतिक्रमण करु नये. असे आवाहन मुख्याधिकारी डॉ.कुलभुषण रामटेके यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here