अनियंत्रित चारचाकी वाहनाची झाडाला धडक, एक गंभीर जखमी

331

The गडविश्व
ता.प्र / धानोरा, २ एप्रिल : धानोरा ते गडचिरोली महामार्गावर चारचाकी वाहन चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात एक जण गंभीर जखमी तर एकजण किरकोळ झाल्याची घटना १ एप्रिल २०२३ सायंकाळी ४.०० वाजताच्या सुमारास घडली.
अपघातात वाहन चालक देवदास हलामी (अंदाजे वय ३८) हा गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे तर संजय बोरसरे हा किरकोळ जखमी असल्याचे कळते.
प्राप्त माहितीनुसार गडचिरोली वरून धानोरा मार्गे छत्तीसगडला CG-08AN1185 क्रमांकाची महिंद्रा कंपनीचे पांढऱ्या रंगाचे वाहन चंद्रपूर चे काम आटोपून जात होते. दरम्यान गडचिरोली ते धानोरा महामार्गावर मध्यवर्ती भागात असलेल्या मोहडोंगरी ते सावरगाव दरम्यान मोडीवर चारचाकी वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्याने झाडाला धडकल्याने एक जण किरकोळ जखमी झाले. त्या वाहनात चार व्यक्ती होते अशी माहिती असून सर्वांना गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार करून गंभीर जखमी असलेल्या वाहन चालकास नागपूर येथे हलवण्यात आल्याचे कळते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here