– खासदार अशोक नेते यांची महिती
The गडविश्व
गडचिरोली, दि.०६ : देशाचे गृहमंत्री अमित शहा यांचा ९ डिसेंबर २०२३ रोजी गडचिरोली जिल्हा दौरा नियोजित होता. परंतु आता काही महत्वाच्या कारणास्तव हा दौरा रद्द झाला असून पुढे ढकलण्यात आल्याची माहिती खासदार अशोक नेते यांनी दिली आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील अनेक विविध विकास कामांचे व प्रकल्प प्रोजेक्टचे भुमिपुजन, कोनसरी येथील प्रोजेक्ट प्रकल्पाचे व वडसा गडचिरोली रेल्वे लाईन चा भुमिपुजन, चिचडोह बँरेजेस प्रकल्पाचे लोकार्पण समारंभ इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आयोजित होते मात्र आता सदर दौरा पुढे ढकलण्यात आला असून समोरील तारखेत घेण्यात येणार आहे अशी माहिती खासदार अशोक नेते यांनी दिली आहे.