– हवामान विभागाने वर्तविले अंदाज
The गडविश्व
गडचिरोली, २० मे : जिल्ह्यावर पुन्हा अवकाळी पावसाचे सावट उभे असून तसा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. हवामान विभागाने नागपूरसह, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली जिल्ह्याकरिता पुढील पाच दिवसांचा अंदाज वर्तविला असून गडचिरोली जिल्ह्यात पाच दिवस येलो अलर्ट जारी केला आहे. विजांच्या कडकडाटेसह अवकाळी पाऊस पडण्याचा इशारा असून नागरिकांनी सावधगिरी बाळगावी असे सुद्धा आवाहन केले आहे.
मागील काही दिवसांपासून उष्णतेत वाढ झाल्याने नागरिक गर्मीने त्रस्त झाले आहे, अंगाची लाही लाही होत असताना व तापमान ४० अंशापलीकडे राहत असल्याने रस्त्यावर शुकशुकाट पहावयास मिळत होता मात्र आता हवामान विभागाने अवकाळी पावसाचा इशारा दिल्याने तापमानात घट होईलच त्याबरोबरच थंडावा सुद्धा नागरिकांना मिळणार आहे. येलो अलर्ट असल्याने विजांचा कडकडाट , मेघगर्जना, वादळ वारा सह पावसाचे आगमन होत असल्याने मात्र उचित खबरदारी घेणेही आवश्यक असून तशी चेतवानीही हवामान विभागाने दिली आहे.
(the gdv, the gadvishva, gadchiroli , nagpur block, avkali paus)