चामोर्शी : हळदवाही येथे आ. डॉ. देवराव होळी यांच्या हस्ते विविध विकासकामे

80

The गडविश्व
चामोर्शी, दि. १८ : आमदार डॉ. देवराव होळी यांनी विविध विकास कामांचा सपाटा लावला असून चामोर्शी तालुक्यातील हळदवाही टोला येथे रविवार १८ ऑगस्ट रोजी २० लाख रुपयांच्या विकसकामांचे भूमिपूजन व लोकार्पण आमदार डॉ. देवराव होळी यांच्या हस्ते करण्यात आले.
आमदार डॉ. होळी हे गडचिरोली विधानसभा क्षेत्रात विविध विकासकामांकरीता निधी उपलब्ध करून देत आहेत. चामोर्शी तालुक्यातील हळदवाही येथे १० लाख रुपयांचे सार्वजनिक सभागृह बांधण्यात आले असता त्याचे लोकार्पण आ.डॉ. होळी यांच्या हस्ते करण्यात आले तसेच येथीलच बुद्ध विहाराला संरक्षण भिंतीची आवश्यकत असल्याने तसेच आ. डॉ .होळी यांनी १० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून आज संरक्षण भिंतीचे भूमिपूजन केले.
सदर कार्यक्रमाला सरपंच नीता पुडो, उपसरपंच छत्रपती दुर्गे, जिल्हाध्यक्ष बंगाली आघाडी सुरेश शहा, अरुण दुधे, प्रवीण खेडकर, केशव दुर्गे, अजय पुडो, दामोदर मेश्राम, किशोर कुकुडकर, कवळू कुकुडकर, विवेक कांबळे, नानाजी रामटेके, रमेश चंदावार, नंदकिशोर वाळके, सोमजी गावळे, रणजित कांदो, प्रवीण गावळे, उमेश पुडो, सुखदेव तलांडे, प्रवीण मेश्राम, नवीन मेश्राम तथा ग्रामस्थ उपस्थित होते.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #MLAHOLI )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here