मुरुमगाव येथे प्रजासत्तत्तक दिनी पार पडले विविध कार्यक्रम

236

The गडविश्व
ता. प्रा / धानोरा, २७ जानेवारी : तालुक्यातील सर्वात प्रथम क्रमांकावर असलेलय मुरुमगाव येथे सर्व शासकीय कार्यालयात २६ जानेवारी निमित्त ध्वजारोहण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले व जि.प. प्राथमिक केन्द्र शाळा मुरुमगाव येथे विविध कार्यक्रम संपन्न झाले.
या कार्यक्रमाचे उदघाटक अजमन मायाराम राऊत माजी पचांयत सभापती धानोरा, तर अध्यक्ष म्हणून शिवप्रसाद गवरना ग्रामपंचायत मुरुमगाव तर प्रमुख पाहुणे म्हणून योगेश कवाडकर मुरुमगाव, मूनिर शेख मुरुमगाव, महेंद्रसिंग कूजाम मुरुमगाव, मदनलाल बढई मुरुमगाव, सदस्य अंजूताई मैदमवार ग्रामपंचायत मुरुमगाव, सदस्य अभिजीत मेश्राम ग्रामपंचायत मुरुमगाव, सदस्य राजेंद्र कोठवार ग्रामपंचायत मुरुमगाव, सदस्य क्रिष्णाबाई भक्ता ग्रामपंचायत मुरुमगाव, सदस्य तिवारी भोयर ग्रामपंचायत मुरुमगाव, तालूका पत्रकार मो.शरीफ भाई कूरैशी धानोरा, सदस्य श्याम बाई जाडे ग्रामपंचायत मुरुमगाव, ओम देशमुख मुरुमगाव, ग्रामसेवक आखाडे ग्रामपंचायत मुरुमगाव व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेलगाव, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खेडेगाव, जिल्हा परिषद प्राथमिक केन्द्र शाळा मुरुमगाव, स्व रामचंद्र दखने विद्यालय मुरुमगाव, शासकीय माध्यमिक पोस्ट बेसिक आश्रम शाळा मुरुमगाव, येथील विद्यार्थी व शिक्षक वर्गा ने आपली उपस्थिती दर्शविली व त्याच बरोबर मुरुमगाव व परिसरातील नागरिक आपली उपस्थित दर्शवली.
या काय॔क्रमात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेलगाव, जिल्हा परिषद प्राथमिक केन्द्र शाळा मुरुमगाव, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खेडेगाव च्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कर्यक्रमातून नृत्यामध्ये सहभाग घेतला.
या कार्यक्रमात प्राथमिक विभाग प्रथम जिल्हा परिषद प्राथमिक केन्द्र शाळा मुरुमगाव प्रथम क्रमांकावर, द्वितीय क्रमांक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खेडेगाव, उच्च प्राथमिक विभाग प्रथम जिल्हा परिषद प्राथमिक केन्द्र मुरुमगाव, द्वितीय पुरस्कार शासकीय माध्यमिक पोस्ट बेसिक आश्रम मुरुमगाव, माध्यमिक विभाग ८ ते १२ स्व.रामचंद्र दखने विद्यालय प्रथम व द्वितीय क्रमांक शासकीय माध्यमिक पोस्ट बेसिक आश्रम शाळा मुरुमगाव ने पटकावून आपल्या शाळेचे नाव रोशन केले.
या काय॔क्रमाचे आयोजन ग्रामपंचायत मुरुमगाव यांनी केले. कर्यक्रमाचे संचालन खोब्रागडे यांनी तर आभार ग्रामसेवक आखाडे ग्रामपंचायत मुरुमगाव यांनी मानले.

(The Gadvishva ) (Gadchiroli News Updates) (Muktipath) (UPSSSC PET Result) (Tata Motors Share Price) (Adani Port share price) (Pariksha Pe Charcha 2023) (Masaba Gupta) (The Last of Us)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here