– अचानक तयार फुटल्याने झाला अपघात
The गडविश्व
ता.प्र /धानोरा, १२ जून : तालुक्यातील रांगी- धानोरा मार्गावर असलेल्या पुंसावडी नाल्याजवळ पिकअपचा मागील टायर फुटल्याने भाजीपाल्याची पिकअप गाडी पलटून अपघात झाल्याची घटना सोमवार १२ जून रोजी दुपारच्या सुमारास घडली. या अपघातात मोठ्या प्रमाणात भाजीपालाचे नुकसान झाले, टमाटर रस्त्यावर पसरल्याने मार्ग काहीकाळ बंद पडला.रांगी येथून धानोरा कडे सोमवारी दुपारी १२ वाजता एमएच ३६ एए ०८३७ क्रमांकाचे पिकअप वाहन भाजीपाला घेऊन जात होते. दरम्यान पुंसावंडी गावाजवळ पिकप गाडीचे मागील टायर अचानक फुटल्याने वाहन पलटले. या अपघातात टमाटर चे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यावेळी वाहनात असलेले टमाटर संपूर्ण रस्ता भर पसरल्याने काही काळ वाहतुकीला खिळ बसलेली होती. मात्र सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अपघातात पिकअप मालकाचे नुकसान झाले असून वाहन चालवत असलेले स्वतः मालक हे सुद्धा किरकोळ जखमी झाल्याचे कळते.
(the gdv, the gadvishva, gadchiroli , dhanora, accident, rangi)