The गडविश्व
ता.प्र / धानोरा, दि. १६ : तालुक्यातील रांगी येथे जनावरांच्या उपचारा करीता लाखो रुपये खर्च करुण श्रेणी १ चा पशुवैद्यकिय दवाखाना १० वर्षा पूर्वी बांधण्यात आला. पण सध्या हाच दवाखाना कर्मचारी अभावी बंद असल्याने हा दवाखाना कोणत्या कामाचा असा प्रश्न गावकरी उपस्थित करिता आहेत. दवाखान्यात ना कर्मचारी, कमर्चारी करीता बांधलेली इमारत बेवारस, सिमेट रस्ते बिनकामी, विहिर, नाली बांधकामावर करोडो रुपये खर्चुनही आता नव्याने शेडचा बांधकाम करण्यात आला तोसुद्धा गावातील बेवारस कुत्रा करिता असा खोचक प्रश्न पशुधन मालक विचारीत आहेत. येवढा खर्च कशा करीता ? कंत्राटदाराचे पोट भरण्याचेकरीता काय? रांगी येथे दवाखाना श्रेणी १ चा असुन येथील दवाखान्यात परिसरातील रांगीसह, निमगाव, बोरी, मासरगाटा, निमनवाडा, शिवागाटा जोडलेला आहे. येथील पशुपालक उपचाराकरिता जनावरे आणले असता कोणाचाच पता लागत नाही. कर्मचाऱ्या अभावि येथील पशुवैद्यकिय दवाखाना सध्या ओस पडलेला आहे. सध्या तिथे कुणाचेच वास्तव्य नाही. तरी तेथे लाखो रुपये शासन खर्च करतो कशासाठी ? येथिल दवाखान्यात असलेल्या शिपायाचे निधन झाले त्यानंतर कोणताही कर्मचार दिला नाही. पशुवैद्यकिय अधिकारी नियुक्त नाही आणि ज्यांच्याकडे प्रभार आहे त्याचा पत्ता लागत नाही. पशुधन पर्यवेक्षक रजेवर असल्याचे कळते. त्यामुळे येथे कुणाचा पता लागत नाही. येथिल दवाखान्याची अतिशय वाईट अवस्था निर्माण झालेली आहे. लवाजमा माञ मोठा दिसतो. जिथे कर्मचारी नाहीत तेथे निवासथान कशाला ? करोडो शासनाचे पाण्यात गेले आता नव्याने बांधण्यात आलेले शेडहि बिनकामी, निवासस्थान पाण्याच्या टाकीसह, ईलेक्ट्रीक, ओटा, दार, खिडक्या विहीर, सिमेंट रस्ता, नाल्या पण कर्मचारी शुन्य. मागील १० वर्षापासून ती इमारत दवाखान्याची व निवासस्थानाची पडुन आहे. बिल्डिंग धूळ खात आहे आणि त्याच बिल्डिंगची आता दयनीय अवस्था झालेली आहे. तिथे डॉक्टर ही राहत नाही इतर कोणताही कर्मचारी राहत नाही असे सुद्धा असतानाही पुन्हा यावर्षी सरकारने तिथल्या कर्मचाऱ्यांकरिता गाड्या ठेवण्याकरिता लाखो रुपयांचे निकामी शेड उभारले आहे. शेड उभारून कोणत्या कामाचे कारण तिथे ना डॉक्टर राहत नाही ना चपराशी ना पशुपालक मग सरकार लाखो रुपये खर्च करतो कशाला हा न उमगणारा प्रश्न येथिल पशुपालकांना पडलेला आहे.