The गडविश्व
ता.प्र / देसाईगंज, दि.१२ : विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटनेचे जिल्हास्तरीय अधिवेशनाचे औचित्य साधून कुथे पाटील विद्यालयाच्या प्रांगणात जिल्हा कार्यकारिणीची अविरोध निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यात आली होती.
सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष व्ही. यू. डायगव्हाणे अध्यक्ष विदर्भ माध्यमिक शिक्षक महामंडळ मुंबई हे होते तर सुधाकरजी अडबाले शिक्षक आमदार नागपुर विभाग तथा सरकार्यवाह विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटना यांच्या नेतृत्वात पार पाडण्यात आली.
यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून शेमदेव चाफले तथा सहायक निवडणूक अधिकारी म्हणून भुवन जुमनाके व सतीश धाईत हे होते. संपूर्ण निवडणूक हि अविरोध झाली असून नवीन कार्यकारणीचे जिल्हा अध्यक्ष रवींद्र नैताम किसान विद्यालय वडधा, कार्याध्यक्ष नरेंद्र भोयर श्री साईनाथ विद्यालय मकेपल्ली, उपाध्यक्ष मनोज निंबार्ते कै. महेश सावकार पोरेड्डीवार हायस्कूल चातगावं, संजय कुंघाडकर कृषक विद्यालय चामोर्शी, यादव बांबले विद्याभारती हायस्कूल गोगाव, माणिक पिल्लारे, कार्यवाह अजय लोंढे इंदिरा गांधी हायस्कूल येणापुर, सहकार्यवाह रेवणाथ लांजेवार भगवंतराव हायस्कूल गोमनी, अरुण राजगिरे किसान विद्यालय कोरेगाव कमलाकर रडके शिवाजी हायस्कूल गडचिरोली, अरुण, वेंकटरमण पोलोजी महात्मा ज्योतिबा फुले हायस्कूल आष्टी, कोषाध्यक्ष अजय वर्धलवार कै.सीताराम पाटील मुनघाटे हायस्कूल काटली, संघटन सचिव कालिदास बनसोड डॉ.आंबेडकर हायस्कूल वायगाव, चंद्रकांत नरुले शिवाजी हायस्कूल कुरखेडा, प्रसिद्धी प्रमुख सूरज हेमके पारबताबाई विद्यालय कोरची, महिला प्रतिनिधी कुमारी मिरा बिसेन वसंत विद्यालय गडचिरोली, कुमारी वनिता जांगावार सिंधुताई पोरेड्डीवार हायस्कूल गोगावं, जिल्हा कार्यकारिणी सदस्य सुनिल गेडाम श्रीनिवास हायस्कूल अंकिसा, रविशंकर सहारे टिप्पागड विद्यालय कोटगुल, विनोद सालेकर शिवाजी हायस्कूल चामोर्शी , मुरलीधर भोयर विवेकानंद हायस्कूल येमली यांची अविरोध निवड करण्यात आली. संपूर्ण कार्यकारणीचे मान्यवरांच्या हस्ते अभिनंदन करण्यात आले व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आले.
नवीन कार्यकारणीच्या पदाधिकारी यांनी संघटना मजबूत करण्यास व शिक्षकांच्या समस्या सोडविण्यास कटीबद्ध राहावे असे आव्हान मा. सुधाकर अडबाले शिक्षक आमदार नागपुर विभाग तथा सरकार्यवाह विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटना यांनी केले.
सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी निवडणूक अधिकारी शमदेव चाफले व सहाय्यक निवडणूक अधिकारी भुवन जुमनाके व सतीश धाईत तथा विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटनाचे सभासद यांनी सहकार्य केले.