-सलग २५ वर्षांपासून सुरु आहे निर्णयांची अंमलबजावणी
The गडविश्व
गडचिरोली, दि. ०१ : मुलचेरा तालुक्यातील धन्नूर या गावात अवैध दारूविक्रीमुळे वारंवार निर्माण होणाऱ्या गंभीर समस्यांमुळे असह्य झालेल्या ग्रामस्थांनी सलग तीन बैठका घेऊन अवैध दारूविक्री बंदीचा ठराव घेतला. एवढेच नव्हे तर कठोर निर्णय अमलात आणून गावाला भांडण व तंटामुक्त केले. आता सलग २५ वर्षांपासून हे गाव अवैध दारूविक्रीमुक्त आहे.
धन्नूर हा १३० घरांची वस्ती असणारा गाव आहे. या गावांमध्ये २५ ते ३० वर्षांपूर्वी अवैध दारूविक्री सुरु होती. त्यामुळे गावात रोज भांडण-तंटे व्हायचे. या प्रकारामुळे त्रस्त झालेल्या प्रतिष्टीत नागरिक, महिला व गावातील लोकांच्या सहकार्याने दारूविक्री बंदीच्या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली. त्यांनतर सलग वारंवार बैठका घेऊन अवैध दारूविक्री मुक्त गाव निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला. सोबतच गावातील समस्या गावातच निर्णय घेऊन सोडवण्याचे ठरले. अशाप्रकारे मागील २५ ते ३० वर्षांपासून गावामध्ये अवैध दारूविक्री बंदी आहे. तसेच दारू पिणारा व्यक्ती हा घरी किंवा गावातील दुसऱ्या व्यक्तीसोबत भांडण केल्यास संबंधित व्यक्तीकडून २५० रुपये घेऊन बैठकीचे आयोजन केले जाते. सदर बैठकीत निर्णय लागल्यास त्या व्यक्तीकडून २ हजारांचा दंड वसूल करण्यात येते. दुसऱ्यांदाही तीच गलती केल्यास त्याच्याकडून १० हजार रुपयांचा दंड व त्यानंतरही दारू पिऊन भांडण केल्यास संबंधित व्यक्तीच्या घरी एकही ग्रामस्थ जाणार नाही असा १० वर्षांपासून नियम तयार करून त्याची अंमलबजावणी केली जात आहे. त्याचप्रमाणे कोरोना काळात दारू पिण्यास बंदी असतांना सुद्धा दुसऱ्या गावामधून दारू पिऊन येणाऱ्या ५ ते सहा जणांकडून प्रत्येकी १ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला होता. अशाप्रकारे ग्रामस्थांनी एकत्र येत मागील २५ ते ३० वर्षांपासून अवैध दारूविक्रीला आळा घातला आहे.
(#thegdv #thegadvishva #gadchirolipolice #gadchirolilocalnews #muktipath )