अवैध व्यवसायाचा बिमोड करण्याकरीता गावकऱ्यांनी सहकार्य करा : पो.नि. महेन्द्र वाघ

752

The गडविश्व
ता. प्र/ कुरखेडा, दि. १८ : तालुक्यातील चिखली व परीसरातील दारू, गांजा, सट्टा या अवैध व्यवसाया विरोधात पोलीस विभागाने कठोर कार्यवाहीचे सत्र सूरू केले आहे. मात्र हे अवैध व्यवसायाचा कायम स्वरूपी बिमोड होण्याकरीता गावकऱ्यांच्या सहकार्याची गरज आहे. गावकऱ्यांनी निर्भय होत सहकार्य करावे असे आवाहन चिखली येथे गावकऱ्यांशी संवाद साधताना कु रखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेन्द्र वाघ यानी केले.
चिखली येथील ग्रामसभेत अवैध व्यवसायाविरोधात ठराव करण्यात आला आहे व त्यांचा घरावर मोर्चा काढत त्यांना अवैध व्यवसाय बंद करण्याबाबत तंबी सूद्धा देण्यात आली आहे. मात्र तरी काही व्यावसायिकांचे मुजोरीने अवैध व्यवसाय सूरूच असल्याचे निदर्शनात येताच शनिवारी पोलिसांनी मेघराज बिसन बालोरे रा.चिखली (वय ४०) याचे खैरीटोला येथे सूरू असलेल्या हातभट्टीवर धाड टाकत २५ लिटर हातभट्टीची मोहफूलाची दारू किमंत ५ हजार व निखील रामदास राऊत (वय २७) रा. चिखली याच्या घरावर धाड टाकत तिथून देशी विदेशी दारूचा एकूण ५ हजार ४०० रूपयाचा मूद्देमाल जप्त केला.
यावेळी पोलीस निरीक्षक महेन्द्र वाघ यांनी चिखली येथे उपस्थित गावकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधला व परीसरात कोणतीही अवैध हालचाल निदर्शनात येताच गावकऱ्यांनी पोलीसांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले. शनिवार धाड टाकून करण्यात आलेल्या कार्यवाहीत दोन्ही आरोपी विरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायदा ६५(ई) अन्वये गुन्हा दाखल करीत अटक करण्यात आली आहे. सदर कार्यवाही पोलीस निरीक्षक महेन्द्र वाघ यांच्या नेतृत्वात महिला पोलीस उपनिरीक्षक वर्षा बोरसे, पोलीस हवालदार शेखलाल मडावी, संदेश भैसारे, प्रदिप भसारकर ल, पोलीस शिपाई मेश्राम, महिला पोलीस शिपाई किरण मडावी, लोहम्बरे यांच्या चमूने केली.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #gadchirolilocalnews )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here