जोगीसाखरा गावात विश्व हिंदू परिषद बजरंग दलाची स्थापना

291

– नवयुवकांचा उसळलेला उत्साह
The गडविश्व
ता.प्र/ आरमोरी, दि. ०९ : गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी तालुक्यातील जोगीसाखरा या गावात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल शाखेची भव्य स्थापना करण्यात आली. या कार्यक्रमास जिल्हा संयोजक अमन गैरवार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या सोबत गावातील ग्रामपंचायत सदस्य स्वप्नील गरफडे, तसेच धनपाल ढोरे, महेश राऊत, शूरवीर गुरणुले, रवी मोहूर्ले आणि तन्मय कांबळी आदी मान्यवरांचा उत्स्फूर्त सहभाग होता.
गावातील युवकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावून कार्यक्रमात जोशात सहभाग नोंदवला. या नवचैतन्याच्या लाटेचा गावभर बोलबाला असून, “जोगीसाखरात आता नव्या विचारांची, नव्या जोमाची लाट उभी राहत आहे,” असे ग्रामस्थ बोलून दाखवत आहेत.
या नव्या पिढीचा आक्रोश आणि संघटनेबद्दलचा उत्साह पाहता गावातील काही जुन्या राजकारण्यांची चांगलीच धांदल उडाल्याचे चित्र आहे. “बजरंग दलचं आता जोगीसाखऱ्यावर राज्य असेल,” अशी भावना नवतरुणांमध्ये दिसून येत आहे.
या उपक्रमामुळे गावात धार्मिक व राष्ट्रभक्तीचा नवा उत्साह संचारत असून, आगामी काळात या नवचळवळीचा प्रभाव गावच्या सामाजिक आणि राजकीय वातावरणावर निश्चितपणे जाणवेल, अशी चर्चा रंगत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here