-१० रुग्णांवर मोफत यशस्वी मोतीबिंदू शस्त्रक्रिया
The गडविश्व
गडचिरोली, दि. ०७ : धानोरा तालुक्यातील कोंदावाही येथे पार पडलेल्या मोफत मोतीबिंदू व नेत्र तपासणी शिबिराच्या माध्यमातून एकूण १७९ रुग्णांवर उपचार करण्यात आले होते. या शिबिरातील १० रुग्णांवर सर्च व महात्मे आय हास्पिटलच्या वतीने १ एप्रिल २०२४ ला महात्मे आय हास्पिटल, नागपूर येथे मोफत यशस्वीरित्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया पार पडली असून या रुग्णांना नवदृष्टी मिळाली आहे.
कोंदावाही येथे सर्च, गडचिरोली, व महात्मे आय हास्पिटल, नागपूर यांच्या संयुक्त माध्यमातून मोफत मोतीबिंदू व नेत्र तपासणी शिबीर दिनांक ५ जानेवारी २०२४ रोजी ग्रामपंचायत मध्ये आयोजित करण्यात आले होते. यात १७९ रुग्णांनी लाभ घेतला व गरजू रुग्णांना औषधी व चष्मे देण्यात आले. सदर शिबिरात सर्च संस्थेचे संचालक मा. पद्मश्री डॉ. अभय बंग व महात्मे आय हास्पिटलचे संस्थापक मा. पद्मश्री डॉ. महात्मे व त्यांची चमू सोबतच सर्च हास्पिटल ची चमू यांनी रुग्णाची मोफत तपासणी केली. या शिबिरातील १० रुग्णाची दिनांक १ एप्रिल २०२४ ला महात्मे आय हास्पिटल, नागपूर येथे मोफत यशस्वीरित्या शस्त्रक्रिया पार पडली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आदिवासी आरोग्य विभाग प्रमुख डॉ. बैतुले, समाज सेवक देवाजी पदा, सर्च कार्यकर्ते अविनाश बदन, निकेश बेले यांनी सहकार्य केले.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #naxalarrest #muktipath )