– भामरागड पंसचे गटशिक्षणाधिकारी यांचे आवाहन
The गडविश्व
गडचिरोली, ५ डिसेंबर : तंबाखु व दारुच्या व्यसनापासून मुक्ती मिळवण्यासाठी तालुक्यात शिक्षक व कर्मचाऱ्यांनी व्यसन उपचार केंद्राला भेट द्यावे, असे आवाहन भामरागड पंसचे गटशिक्षणाधिकारी यांनी केले आहे.
गडचिरोली जिल्हा दारू व तंबाखुमुक्त व्हावा, आरोग्याचे रक्षण व्हावे या हेतूने गडचिरोली जिल्ह्यात ‘मुक्तीपथ’ अभियानाद्वारे शिक्षक, कर्मचारी यांना दारू व तंबाखूचे व्यसनाधिनतेपासून मुक्ती मिळविण्यासाठी भामरागड तालुक्याच्या ठिकाणी मुक्तीपथ कार्यालयात व्यसन उपचार केंद्र स्थापीत केलेले आहे. त्याठिकाणी व्यसनावर उपचार मिळणार आहे. त्याकरीता व्यसनाच्या आहारी गेलेल्या शिक्षक/ कर्मचारी यांनी केंद्राला भेट देवून व्यसन उपचार करुन घ्यावा व व्यसनापासून मुक्ती मिळवावी. असे आवाहन भामरागड पं.स चे गटशिक्षणाधिकारी यांनी पत्रकातून केले आहे.
(The Gadvishva) (Gachiroli News Updates) (Gadchiroli) (Muktipath)