धानोरा तालुक्यात सरपंच पदाच्या आरक्षणासाठी सोडत १७ एप्रिलला

98

The गडविश्व
ता. प्र/धानोरा, दि.१५ : तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या सन २०२५ ते २०३० या कालावधीतील सरपंच पदासाठी आरक्षण निश्चित करण्यासाठीची सोडत १७ एप्रिल २०२५ रोजी काढण्यात येणार आहे. यासंदर्भातील पत्र संवर्ग विकास अधिकारी यांच्या मार्फत सर्व ग्रामपंचायतींना पाठविण्यात आले आहे.
यापूर्वी सन २०२०-२५ या कालावधीतील सरपंच पदाचे आरक्षण ३० मार्च २०१५ रोजी जाहीर करण्यात आले होते. आता नवीन कार्यकाळाकरिता आरक्षण ठरविण्यात येत असून, संबंधित सोडत १७ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता तहसिल कार्यालय, धानोरा येथील सभागृहात पार पडणार आहे.
धानोरा तालुका डोंगराळ व अतिदुर्गम भागात येतो. येथील अनुसूचित जमातींची लोकसंख्या लक्षणीय असल्याने हा तालुका पेसा (PESA) अंतर्गत समाविष्ट आहे. यामुळे तालुक्यातील ६१ ग्रामपंचायतींपैकी ३१ ग्रामपंचायतींसाठी सरपंच पद अनुसूचित जमाती महिला राखीव ठेवण्यात आले आहे, तर उर्वरित ३० ग्रामपंचायतींसाठी अनुसूचित जमाती सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. हे आरक्षण जिल्हाधिकारी गडचिरोली यांच्या आदेशानुसार करण्यात आले आहे.
तालुका निवडणूक अधिकारी, तहसील कार्यालय धानोरा यांनी सर्व सरपंच, उपसरपंच, सदस्य तसेच ग्रामस्थ आणि प्रतिष्ठित नागरिकांना या सोडतीस उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here