वडसा-आरमोरी वनपरिक्षेत्रातील प्रलबिंत मजुरीस मजूरांचे उपोषण

270

– गडचिरोली जिल्हा आदिवासी काँग्रेस सचिव दिलीप घोडाम यांची उपोषण कर्त्यांशी भेट
The गडविश्व
ता.प्र / आरमोरी ( नरेश ढोरे) : वडसा वनविभाग वडसा- आरमोरी या वनपरीक्षेत्रात सन २०१९ पासुन मोठया प्रमाणात वाघाची संख्या वाढली आहे. तसेच आतापर्यंत २५ ते ३० लोकांचा बळी घेतलेला आहे. वाघाचे जंगलात एकटा फिरणारा वनरक्षक याकडे पुरेसा लक्ष देवु शकत नाही म्हणुन वाघाचे सरंक्षण करणे ट्रॅप कॅमेरे लावने, कॅमेरा रोज तपासुन त्याची दररोज रीपोर्ट सादर करणे, गावागावात जनजागृती करणे, वाघांच्या पायांचे ठसे घेणे, या करीता ज्यांना या कामाची जाणीव आहे अश्या मजुरांना कामावर लावण्यात आले होते.परंतु त्यांची मजुरी १८ महिण्यापासून प्रलबिंत असल्यामुळे त्याच्या कुटुबांवर उपासमारीची वेळ आली तसेच त्यांच्या कुटुंबावर मुलाबाळांच्या शिक्षणावर विपरीत परीणाम होत असल्याने २९ डिसेंबर २०२२ पासुन वडसा वनविभाग वडसा कार्यालया समोर वाघ्र संरक्षण मजुर उपोषनाला बसलेले आहे. यावेळी गडचिरोली जिल्हा आदिवासी काँग्रेस सचिव दिलीप घोडाम यांनी उपोषण मंडपाला भेट देऊन समस्या जाणून त्यांच्या उपोषनाला पाठिंबा दर्शवून उपवनसंरक्षक देसाईगंज यांची स्वता भेट घेऊन वडसा वनविभागातील वडसा-आरमोरी वनपरीक्षेत्रात वाघाच्या बंदोबस्त करीता लावण्यात आलेले मजुरांची प्रलंबित असलेली मजुरी देण्यात यावी या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या मजुरांची मजुरी देण्यासंबंधी चर्चा करण्यात आली व वनसरक्षक गडचिरोली वनवृत्त यांच्याशीही दुरध्वनी वरुण मागणी केली असता वनसरक्षक किशोर मानकर यानी सकारात्मकता दर्शवून गडचिरोली जिल्हा आदिवासी काँग्रेस सचिव दिलीप घोडाम यांना सहा दिवसांत सर्व व्याघ्र प्रकल्पातील मजुरांची मजुरी दिली जाईल असे आश्वासन दिले.
उपोषण मंडपाला भेट देते वेळी सामाजिक कार्यकर्ते शकर मैद, नितेश पाटील, संजय वाकडे, धनवान दोनाडकर, निकेश शेंद्रे, चंद्रकांत दोनाडकर, किती लाल मेत्राम, सोमेश्वर कुमरे, ईश्वर गुरुनुले, मोरेश्वर बोरुले, राजेंद्र दोनाडकर, दिगाबर बुल्ले, अलोक ठाकरे, गंगाधर बुले, विलास ठाकरे, अरुण दुपारे, एकनाथ बेदरे, सुभाष बेदरे, गणेश चौधरी, विनोद धुवै गुरुदेव बगमारे, रोहीत कादोर, मोहीत उपस्थित होते.

(The Gadvishva) (Gadchiroli News Updates) (MLA Krushna Gajbe)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here