The गडविश्व
गडचिरोली, दि. १५ : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त काल गडचिरोलीतील इंदिरा गांधी चौकात भव्य कार्यक्रम पार पडला. बहुजन समाज, कर्मचारी संघटना तसेच उच्चशिक्षित नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून बाबासाहेबांच्या प्रतिमेला अभिवादन केले.
या जयंतीनिमित्त सार्वत्रिक बहुउद्देशिय संस्था, नवेगाव (गडचिरोली) यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत कार्यक्रमस्थळी आलेल्या नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली. तसेच छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा जोतिराव फुले यांच्या कार्यावर आधारित प्रेरणादायी पुस्तके विक्रीसाठी ठेवण्यात आली होती. विशेष म्हणजे, कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या मान्यवर पाहुण्यांना ही पुस्तके सन्मानचिन्ह म्हणून भेट देण्यात आली.
या उपक्रमाची संपूर्ण जबाबदारी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी अतिशय चिकाटीने पार पाडली. संस्थेच्या अध्यक्षा सौ. ज्योती धिरजकुमार जुमनाके, उपाध्यक्ष विजय आत्राम, सचिव सुनीलजी दुर्गे, कोषाध्यक्ष धीरजकुमार जुमनाके, सभासद रेवनाथ निकुरे, संगीता कुमरे, Dr. अभिजीत गेडाम आणि सल्लागार मुकुंद मेश्राम यांचे विशेष योगदान लाभले.
कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी सौ. ज्योतीताई जुमनाके यांनी उपस्थित सर्व मान्यवर, पाहुणे, नागरिक आणि स्वयंसेवकांचे मनःपूर्वक आभार मानले आणि कार्यक्रमाच्या यशस्वीतेची घोषणा केली.
