गोरगरिबाच्या पोटावर पाय दिल्यास नगर परिषदेला टाळे ठोकू

119

– सोशल मीडिया जिल्हा प्रमुख तथा शहर संघटक शिवसेना रुपेश वलके यांचा इशारा
The गडविश्व
गडचिरोली, दि. ०३ : जिह्यात आधीच बेरोजगारीचा टप्पा गाठला आहे, जिल्ह्यात उद्योग धंदे व पुरेसा रोजगार नाही त्यातही येथील रोजगाराना हाती काम नसल्याने मिळेल त्या धंद्याने आता स्वतःचे पोट भरतात परंतु तीन महिने झाले की गडचिरोली नगरपरिषदद्वारे नेहमी अतिक्रमण हटाव मोहीम राबवून बेरोजगाराच्या पोटावर पाय पडण्याचे काम करत आहे. त्यामुळे गोरगरिबाच्या पोटावर पाय दिल्यास नगर परिषदेला टाळे ठोकू असा इशारा शिवसेना सोशल मीडिया जिल्हा प्रमुख तथा शहर संघटक रुपेश वलके यांनी दिला आहे.
नगरपरिषदेने आधी शहरातील रस्ते, नाल्या, विद्युत, घनकचरा आणि स्वतःच्या शासकीय कामामध्ये होणारा विलंबाचा सुधार करावा व त्यांनतरच गडचिरोली शहरातील बेरोजगारांची दुकाने हटवावी. नेहमी नेहमी त्रास देणाऱ्या नगरपरिषद ने आता गडचिरोलीच्या बेरोजगाराना आधी हाती रोजगार द्यावा. गोर गरीब असलेल्या बेरोजगारांचे अतिक्रमण हटवून त्यांच्या पोटावर पाय दिल्यास शिवसेना स्टाईल ने आंदोलन करून गडचिरोली नगरपरिषदे ला टाळे ठोकू असा इशारा रुपेश वलके यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here