नक्षल्यांचा सप्ताह : मुरुमगाव परिसरातील बाजारपेठ तथा दुकाने बंद

892

The गडविश्व
ता.प्र / धानोरा, २८ जुलै : नक्षलवादी संघटनेकडुन दरवर्षी २८ जुलै ते ०३ ऑगस्ट या दरम्यान नक्षल शहिद सप्ताह पाळण्यात येतो. दरम्यान धानोरा तालुक्यातील प्रथम क्रमांकाकाची ग्रामपंचायत मुरुमगाव असुन परिसरातील सावरगाव, कूलभटी, बेलगाव, येरकड तसेच मुख्य मार्गावरील बाजारपेठ बंद ठेवण्यात आले होते.
प्रशासनिक कार्यालय, शाळा, बँक, आरोग्य केंद्र, वन विभाग कार्यालय इत्यादी प्रशासनीक कार्यालय पुर्ण वेळ सुरू होते. परिवहन महामंडळाच्या बसेस व खाजगी वाहतुक सुरू होती. बाकी इतर चारचाकी दुचाकी वाहनांची नियमित ये-जा सुरू होती. मुरुमगाव परिसरात नक्षली हिंसा आणि नक्षली पत्रके आढळले नाही. एकंदरीत वातावरण शांत आढळून आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here