The गडविश्व
गडचिरोली, दि. ०४ : संत महात्म्यानी सांगिल्याप्रमाणे दिन – दुबळ्यांची सेवा हिच खरी ईश्वर सेवा असून शिवकल्याण युथ मल्टीपरपज डेव्हलपमेंट असोसिएशन गडचिरोली आणि राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघ गडचिरोली च्या वतीने नवीन वर्षाचे औचित्य साधून सामाजिक बांधिलकी जपत, निवासी अपंग विद्यालय, गडचिरोली येथील दिव्यांग मुलांसोबत नवीन वर्षाचे स्वागत केले.
यावेळी संस्थेच्या वतीने दिव्यांग मुलांना खाउचे वाटप करण्यात आले व त्यांच्याशी हितगुज करून त्यांचे सुख दुःख समजून घेण्याचा प्रयत्न उपस्थितांनी केला.
यावेळी शिवकल्याण संस्थाध्यक्ष अनुप कोहळे, राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघ गडचिरोली जिल्हाध्यक्ष राहुल भांडेकर, सामाजिक कार्यकर्ते सेवा निवृत्त नायब तहसीलदार सुनील चडगुलवार, शिवकल्याण संस्था सहसचिव संतोषी सूत्रपवार, महेंद्र लटारे, विकास मादेसवार, कृतिका काठवले, अजय सोमनकर, गणेश सूत्रपवार सह इतर युवक व सामाजिक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.