–पक्षाने काय बघून दिली उमेदवारी अशी जनमानसात चर्चा
The गडविश्व
गडचिरोली, दि.०६ : लोकसभा निवडणुक २०२४ चा बिघुल वाजला नी वाजला विविध पक्षाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आल्या. पहिल्या टप्यातील मतदान १९ एप्रिल रोजी आहे. अशातच गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राकरिता एका पक्षाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आलेल्या उमेदवारावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल असल्याची बाब नामनिर्देशन पत्रातून पुढे आली आहे. त्यामुळे पक्षाने काय बघून अशा गुन्हेगारी प्रवुत्तीच्या उमेदवारास उमेदवारी दिली अशी खमंग चर्चा लोकसभा क्षेत्रात सुरू आहे.
लोकसभा निवडणुकीकरिता उमेदवारी मिळालेल्या उमेदवारास नामनिर्देशन दाखल करतांना आपली संपत्ती, आपल्यावर असलेले गुन्हे व आदी माहिती त्यात नमूद करावी लागते. नामनिर्देशन दाखल करून चिन्हही मिळाले आणि प्रचारास सुरुवात करण्यात आली आहे. गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राच्या निवडणुकीकरिता १० उमेदवार रिंगणात आहेत. मात्र या उमेदवारांचे शिक्षण, संपत्ती, त्यांच्यावर असलेले गुन्हे याबाबतची माहिती मतदाराला काही ठाऊक आहे काय ? उमेदवारांकडून प्रचार, मतदारांच्या घरभेटी घेऊन विविध आश्वासन सुरू आहेत. या दहाही उमेदवारांच्या शिक्षण, संपत्ती, तसेच कोणावर किती गुन्हे दाखल आहेत याबाबत माहिती नामनिर्देशन अर्जातून प्राप्त झाली आहे. त्यात असे उघडकीस आले की काही उमेदवार हे उच्चशिक्षित आहेत, काहींची संपत्ती लाखोंच्या घरात आहेत तर गुन्हेगारी बाबत तपासले असता या दहापैकी केवळ वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार हितेश मडावी यांच्यावर विनयभंग व लैंगिक अत्याचार पोस्को अंतर्गत तसेच विविध कलमनाव्ये गुन्हा दाखल असल्याचे उघडकीस आले. तर ते उच्च माध्यमिक शिक्षक आहेत.
त्यामुळे पक्षाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी काय बघून त्यांना उमेदवारी दिली असा प्रश्न उपस्थित होत असून याबाबत लोकसभा क्षेत्रात खमंग चर्चा सुरू आहे.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #loksabhaelection2024 )