– १८ जुन ते ०२ जुलै पर्यंत विशेष ऑनलाईन फॉर्म भरण्याची मोहीम
– योजनेचा लाभ घेण्याचे आरोग्य विभागाचे आवाहन
The गडविश्व
गडचिरोली, दि. २१ : माता व बालकांचे आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीने गर्भवती माता व स्तनदा मातेला सकस आहार घेण्यास प्रोत्साहीत करणे, त्यांच्या आरोग्यात सुधारणा व्हावी व जन्माला येणाऱ्या नवजात बालकांचेही आरोग्य सुधारावे मातामृत्यू व बालमृत्यू दरात घट होऊन तो नियंत्रीत राहावा यासाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री मातृ वंदना योजना सुरु केलेली आहे.
प्रधानमंत्री मातृ वंदना योजेनचा जास्तीत जास्त लाभ देण्यासाठी मंत्रालय महिला व बालकल्याण विभाग, नई दिल्ली द्वारे १८ जुन २०२४ ते ०२ जुलै २०२४ या कालाधीत ऑनलाईन लाभार्थी नोंदणीसाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. गडचिरोची जिल्हयात पहिले अपत्ये व दुसरे अपत्य मुलगी असलेल्या पात्र लाभार्थ्यांसाठी १८ जुन ते ०२ जुलै पर्यंत विशेष ऑनलाईन फॉर्म भरण्याची मोहीम सुरु असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे यांनी सांगितले आहे.
प्रधानमंत्री मातृ वंदना योजना २.० राज्यात ९ ऑक्टोंबर नुसार २०२३ लागु झाली आहे. या योजनेचा जास्तीत जास्त लाभ देण्यासाठी गडचिरोली जिल्हयातील आशा वर्कर व आरोग्य सेविका मार्फत प्राथमिक आरोग्य केंद्र आणि सर्व आरोग्य सेवा कार्यक्षेत्रांमध्ये ऑनलाईन नविन लाभार्थी नोंदणी व पोस्टाचे इंडिया पोस्ट पेमेंट बँक (IPPB) खाते उघडणेबाबत अभियान राबविण्यात येणार आहे. ही योजना शहरी व ग्रामीण भागामध्ये लागु करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत शासनाचे अधिसुचित केलेल्य संस्थेत नोंदणी केली असेल अशाच पात्र महिलांना या योजनेचा लाभ पहिल्या जिवंत अपत्यांसाठी ५ हजार रुपयांचा दोन टप्प्यात तसेच दुसरे अपत्य मुलगी जन्मल्यास ६ हजार रुपयांचा लाभ एकाच टप्प्यात थेट आधार लिंक व DBT (NPCI) लिंक असलेल्या खात्यात जमा केल्या जातो. ही योजना शासकीय सेवेत खाजगी सेवेत किंवा ज्या मातेला ६ महिन्याची प्रसुती रजा मंजुर आहे अशा माता वगळून इतर सर्व मातांना देय आहे.
गडचिरोली जिल्हयातील पात्र महिलांनी प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी विजय भाकरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती आयुषी सिंह, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.प्रमोद खंडाते, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ.प्रफुल हुलके यांनी केले आहे.
प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेच्या लाभासाठी निकष
(कोणत्याही एका निकषाच्या ओळखपत्र पुराव्याची प्रत जोडणे आवश्यक आहे.)
i) ज्या महिलांचे निव्वळ कौटुंबिक उत्पन्न प्रतिवर्ष रुपये ८ लाखापेक्षा कमी आहे. (तहसिलदाराचे Income certificate)
ii) अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या महिला. (लाभार्थीचे नावाचे Cast Certificate)
iii) ज्या महिला अंशत: (४०%) किंवा पुर्ण अपंग आहेत (दिव्यांग जन)
iv) बीपीएल शिधापत्रिकाधारक महिला (BPL Ration Card लाभार्थीचे नाव असणे आवश्यक)
v) आयुष्यमान भारत अंतर्गत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना(PMJAY) अंतर्गत महिला लाभार्थी.
vi) ई-श्रम कार्ड धारण करणाऱ्या महिला
vii) किसान सन्मान निधी अंतर्गत लाभार्थी महिला शेतकरी
viii) मनरेगा जॉब कार्ड घेतलेल्या महिला
ix) गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या अंगणवाडी सेविका (AWW) अंगणवाडी मदतनीस (AWHs) /आशा कार्यकर्ती (ASHs). (लाभार्थी स्वत: अंगणवाडी सेविका/मदतनीस, आशावर्कर असल्याचे प्रमाणपत्र).
x) राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा (NFSA) 2013 अंतर्गत शिधापत्रिकाधारक महिला लाभार्थी.(लाभार्थीचे नावाने असलेले रेशन कार्ड)
१८ जुन २०२४ व ०२ जुलै २०२४ पर्यंत राबविण्यात येणाऱ्या मोहिमेदरम्यान आशा वर्कर व आरोग्य कर्मचाऱ्यासोबत संपर्क साधुन पोर्टलवर अर्ज भरणेबाबत कु.अश्विनी मेंढे, जिल्हा कार्यक्रम समन्वयक प्रधानमंत्री मातृ वंदना योजना, गडचिरोली यांनी सांगितले. मोहीमे दरम्यानचा अहवाल व कार्यक्रमाची निगराणी करण्याची जबाबदारी कु.अश्विनी मेंढे,जिल्हा कार्यक्रम समन्वयक व चंदु वाघाडे जिल्हा कार्यक्रम सहाय्यक प्रधानमंत्री मातृ वंदना योजना, गडचिरोली यांची असणार आहे.
(#thegadvishva #thegdv #gadchirolinews #gadchirolilocalnews #muktipath #Bangladesh vs Australia #Spain vs Italy #Virat Kohli #Jasprit Bumrah #Rishabh Pant #Donald Sutherland #CEOAyushisingh #zpgadchiroli #People with disabilities should reach out to avail government schemes: CEO Ayushi Singh #Mahadbt)