– भुजल सर्वेक्षणाच्या अटीत सापडला अनुशेष
The गडविश्व
ता.प्र / धानोरा, २४ एप्रिल : तालुक्यात अनुसूचित जाती व जमाती या प्रवर्गातील उमेदवारांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन व बिरसा मुंडा कृषी क्रांती या दोन्ही योजने अंतर्गत १०० टक्के अनुदानावर देण्यात येणाऱ्या सिंचन विहीर भुजल सर्वेक्षणाच्या अटीमुळे गोठल्या आहेत. त्यामुळे तालुक्याचा अनुशेष पुर्ण होईल तरी कधी ? असा प्रश्न तालुक्यातील जनता विचारीत आहेत.
गडचिरोली जिल्ह्यातील सन २०२२-२३ या वर्षात बिरसामुंडा कृषी क्रांती योजने अंतर्गत ३५८ तर डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेत १७१ विहीरी पात्र लाभार्थी मोठ्या प्रमाणात आहेत. १०० टक्के अनुदानावर असुन अनुदानाची रक्कम २५०००० च्या घरात असली तरी यासाठी भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेकडून प्रस्तावित विहिरीच्या भागात पाणी असल्याचे प्रमाणपत्र अर्थात दाखला देणे बंधनकारक आहे तर हे प्रमाणपत्र मिळवणे लाभार्थासाठी एक प्रकारची तारेवरची कसरत आहेत. भूजल सर्वेक्षण यंत्रणेने जिल्ह्यातील मोजकेच गावे पात्र ठरवली आहेत त्यामुळे या दोन्ही योजनांना जिल्ह्यात खिळ बसली असून हजारो लाभार्थी वंचित राहत आहेत. दरम्यान ही अट रोजगार हमी योजनेतील विहिरीच्या लाभासाठी शिथिल करण्यात आली हे येथे उल्लेखनीय असल्यामुळे या योजनेत येणाऱ्या घटकावर अन्याय होत असल्याच्या संतप्त भावना व्यक्त होत आहेत.
सिंचन सुविधांची वाणवा असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यात सिंचनाचा टक्का वाढावा, मागासवर्गीय घटकांना सिंचनाद्वारे विकासाच्या प्रवाहात आणण्यात यावे या उद्देशाने अनुसूचित जाती प्रवर्गातील घटकासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना व अनुसूचित जमाती प्रवर्गातील घटकासाठी बिरसा मुंडा कृषी क्रांती या योजनेअंतर्गत सिंचन विहीर देण्यात येतात. या दोन्ही योजना अल्पभूधारकांसाठी असून विहिरीसाठी प्रत्येकी अडीच लाखाचे अनुदान देण्यात येते. जमिनीचा सातबारा, मालकी हक्क या प्रमुख कागदपत्रात व्यतिरिक्त आधार कार्ड, बँक खाते, अधिक कागदपत्र आवश्यक आहेत तर या योजनेअंतर्गत विहिरीचा लाभ घेण्याकरता भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेचे विहीर प्रस्तावित धानोरा तालुक्यात बिरसा मुंडा कृषी क्रांतीसाठी ४७, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन ०७ विहिरी आहेत. तालुक्यात सिंचनाचा प्रचंड मोठा अनुशेष आहे. हा अनुशेष भरून काढण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. मात्र हे प्रयत्न अपुरे पडत असल्याचे निदर्शनास येत आहे. अद्यापही जिल्ह्याच्या अनेक भागात सिंचन सुविधाची वानवा आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नद्या आहेत, तलावही आहेत मात्र तरीही सिंचनाचा अभाव आहे. सिंचन सुविधा वाढवण्यासाठी आता ठोस प्रयत्नाची गरज असल्याचे बोलल्या जात आहेत. मात्र तालुक्यातील अनुसुचित जाती /जमातिचा सिंचन अनुशेष पुर्ण होईल तरी केव्हा असा प्रश्न तालुक्यातील जनता विचारीत आहेत.
बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना सन २०२२- २३ असलेले लाभार्थी
नर्सिंग मन्साराम धुर्वे ( रोडवाही), गणेश देवसिंग पुडो (रेंगागाव), मंगलसिंग राजू नरोटे (पण्णेमारा), मेहताप मुर्हा र्कोठपरिया (मुरूमगाव), नरसिंग रामाजी घोरापट्टीया (खेडेगाव), वर्षा देवराव हिचामी (रांगी), लतखोर दशरथ राऊत (कुलभट्टी), ललिता अवसु नरोटे (दराची), पूजा प्रभाकर उसेंडी (सोडे), प्रकाश सुकरू कोराम (येरकड), वर्षाताई राजाराम तुलावी (भुसूमखुडो), सोनसाय धनसिंग नैताम (कोसमी), चौदर मानु कोवाची (वाघभुमी), वासंतीबाई मंगू कोवा (परसविहीर), भारत जलसूराम चुर्गिया (कुलभट्टी), सुजान सिंग अलालसिंग भुरकुरीया (बेलगाव), रजनी भृपत क्रिपाल (मुरूमगाव), प्रदीप कुमार यमदास कोठवार( मुरूमगाव), रैनु तोटा पदा (कोंदावाही), बाबुराव डारुराम वडे (उमरपाल), वसंतराव बिहाउराव हलामी( बेलगाव), सुधाकर सावजी कोल्हे (मेटेजांगदा), तुकाराम सावजी हल्लामी( निमगाव), पद्मा वासुदेव कुमोटी (एरंडी), रत्नमाला कालिदास मडावी (देऊळगाव), जीवन शहा मनीराम तुलावि (ढवळी).
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना सन २०२२-२३
मीराबाई यशवंत सहारे (मोहली), मधुकर किसन भानारकर (कुलभट्टी)
एन.एच.बाबर तालुका कृषि अधिकारी पंचायत समिती धानोरा यांना प्रत्यक्षात विचारना केली असता सांगितले की, धानोरा तालुक्यातील २७ कामाला तांत्रिक प्रशासकीय मान्यता मिळाली असून त्याचे वर्क आऊट निघाले आहे. तर २७ पैकी १२ विहिरींना भूजल सर्वेक्षण कार्यालयाचे प्रमाणपत्र मिळाले असून त्या ठिकाणी काम चालु आहे.
(the gdv) (the gadvishva) (gadchiroli dhanora)