‘पुष्पा’ तिरुपती तुरुंगातून कुठे गेला पळून : बघा ‘पुष्पा २’ धमाकेदार टीझर

1481

The गडविश्व
हैद्राबाद, ७ एप्रिल : अल्लू अर्जुन च्या पुष्पा चित्रपटाने अक्षरशः धुमाकूळ माजवला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला, त्यानंतर अल्लू अर्जुनचे चाहते चित्रपटाच्या सिक्वलची आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, निर्मात्यांनी ‘पुष्पा द रुल’ संदर्भात एक मोठे अपडेट दिली असून आज चित्रपटाच्या निर्मात्यांनी ट्विटरवर ‘पुष्पा 2’ धमाकेदार टीझर प्रदर्शित केला आहे.

या टीझरमध्ये अल्लू अर्जुन पाहायला मिळत आहे. पुष्पा तिरुपती जेलमधून पळून गेला आहे. तुरुंगातून फरार झाल्यानंतर तो आता कुठे आहे याबाबत चर्चा सुरु असते. त्याच्या समाजातील कामांचीही माहिती दिली आहे. ‘पुष्पा द राइज’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. या चित्रपटाचे एकूण कलेक्शन ३५० कोटींहून अधिक होते. या चित्रपटात अल्लू अर्जुनच्या विरुद्ध दक्षिणेची दिग्गज अभिनेत्री रश्मिका मंदान्ना दिसली होती.

(The gdv) (The gadvishva) (Pushpa 2 Teaser) (Where did ‘Pushpa’ escape from Tirupati Jail: Watch ‘Pushpa 2’ Explosive Teaser)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here