– पोलीस प्रशासन अनभिज्ञ ?
The गडविश्व
चेतन गहाणे / आरमोरी, दि. २७ : शहर हे अवैध धंद्यांचे हब झाले असून शहरात व तालुक्यातून अवैध तंबाखू विक्री, दारू विक्री, सट्टा पट्टी, कोंबडे बाजार याला ऊत आले असतांना दिसत असून शहरात खुलेआम ‘सट्टा’ चालत असल्याची माहिती आहे. मात्र राजरोस खुलेआमपने चालत असलेल्या ‘सट्टा’ बाबत पोलीस प्रशासन अनभिज्ञ आहेत काय ? येथील सट्टा चालक हा या भागातील ‘सट्टा किंग’ म्हणून ओळखला जात असल्याचे कळत असून या ‘सट्टा किंग’ ला पाठबळ कुणाचे ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
पोलीस अधिक्षकांनी अवैध धंदयांवर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हयातील सर्वच पोलीस स्टेशन, उपपोलीस स्टेशन यांना दिले आहे. आरमोरी शहरात दारू विक्री, तालुक्यातील कोंबडा बाजार, सट्टा पट्टी अशा अवैध धंद्यांना उत आले आहे. शहरातील दुर्गा मंदिर परिसर, पंचायत समिती परिसर, नेहरू चौक काळागोटा परिसरात मोठया प्रमाणात खुलेआम अवैध सट्टा चालत असल्याची माहिती असून अनेकजण आहारी जात असल्याने त्याचा परिणाम युवा वर्गावरही होताना दिसत आहे. शहरात जिकडे तिकडे आकड्यांचे संभाषणही ऐकायला मिळत असल्याचे कळते. “अरे काय आला, कोणता आकडा ओपन आणि कोणता क्लोज आला” अशा चर्चा रंगतांना दिसत आहे. शहरात सट्टा चालवणारा सट्टा चालक हा त्या परिसरातील ‘सट्टा किंग’ म्हणून ओळखल्या जात असल्याचे समजते. त्यावर कोणीही कारवाई करू शकत नाही असे तो छातीठोकपणे सांगतो असे कळते त्यामुळे या सट्टा किंग ला पाठबळ कुणाचे ? पोलीस प्रशासन यावर अंकुश लावणार काय याकडे लक्ष लागले आहे.
(the gdv, the gadvishva, gadchiroli news updates, armori, police, crime news, gadchiroli, chamorshi, wadsa, aheri, dhanora )