– निवडणूक लढण्याकरीता काँग्रेसकडून इच्छुकांची गर्दी
The गडविश्व
गडचिरोली, दि.१२ : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ चे वारे वाहू लागले असतांना सगळे राजकीय पक्ष कामाला लागलेले आहेत. काँग्रेस पक्षाच्या वतीनेही उमेदवार चाचपनीला सुरुवात करण्यात आली असून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सुचनेनुसार गडचिरोली – चिमूर लोकसभा क्षेत्रातकरीता काँग्रेस पक्षाने इच्छुक उमेदवाराचे अर्ज मागविले असता ६ ते ९ जानेवारी २०२४ पर्यंत एकूण नऊ (९) इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज जिल्हा काँग्रेस कार्यालय गडचिरोली येथे सादर केले असल्याची माहिती गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी दिली आहे.
इच्छुक उमेदवारांमध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव डॉ. नामदेव किरसान, माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, माजी आमदार आनंदराव गेडाम, प्रदेश सचिव डॉ. नितीन कोडवते, माजी जि. प. सदस्य नंदू नरोटे, निलेंज मरस्कोल्हे, युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव डॉ. प्रणित जांभुळे, नारायन जांभुळे, हरिदास बारेकर यांनी आपला अर्ज जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या मार्फतीने पक्षश्रेष्टीकडे सादर केला आहे.
त्यामुळे आता गडचिरोली-चिमूर लोकसभे करिता काँग्रेस कडून कोणाला तिकीट मिळणार याकडे लक्ष लागले आहे. मागील टर्म मध्ये माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी यांना उमेदवारी मिळाली होती मात्र काही मतांनी त्यांचा पराभव झाला होता. या टर्म ला सुद्धा त्यांनी उमेदवारी मिळावी याकरिता अर्ज दाखल केले असून आता पुन्हा त्यांना संधी देण्यात येणार काय ? की इतर कोणाला संधी देण्यात येणार आहे हे सुद्धा पाहणे आवश्यक आहे. एकंदरीत काँग्रेस कडून डॉ.नामदेव किरसान सुद्धा आपला संपर्क वाढवण्याच्या दृष्टीने संघटन वाढवीत आहे. तर त्यांनाच तिकीट मिळणार असे मध्यंतरी चर्चा सुरू होती. त्यामुळे आता कोणाला तिकीट मिळणार आणि कोणाचं तिकीट कापणार याकडेही लक्ष लागले आहे.